Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(२५-२१
त्ववृशोरमला दीप्तिरास्पृशन्ती शिरः पुनः । पुनाति पुण्यधारेव जगतामेकपावनी ॥ २१ तवेवमाननं धत्ते प्रफुल्लकमलश्रियम् । स्वकान्तिज्योत्स्नया विश्वमाक्रामच्छरदिन्दुवत् ॥ २२ अनाट्टहासहुङ्कारमदष्टोष्ठपुटं मुखम् । जिनाख्याति सुमेषोभ्यस्तावकों वीतरागताम् ॥ २३ त्वन्मुखादुद्यता दीप्तिः पावनीव सरस्वती । विषन्वती तमो भाति जिन बालातपद्युतिः ॥२४ त्वन्मुखाम्बुरुहालग्ना सुराणां नयनावली । भातीयमलिमालेव तदामोवानुपातिनी ॥ २५ मकरन्दमिवापीय त्वद्वक्त्राब्जोद्गतं वचः । अनाशितभवं भव्यभ्रमरा यान्त्यमी मुदम् ॥ २६ एकतोऽभिमुखोऽपि त्वं लक्ष्यसे विश्वतोमुखः । तपोगुणस्य माहात्म्यमिदं नूनं तवाद्भुतं ॥ २७ विश्वदिक्कं विसर्पन्ति तावका वागभीषवः । तिरश्चामपि हृद्ध्वान्तमुद्धन्वन्तो जिनांशुमन् ॥
हे प्रभो, आमच्या मस्तकाला स्पर्श करणारी व जगाला सर्वथा पावन करणारी, आपल्या दोन डोळ्यांची निर्मल अशी कान्ति पुण्यधारेप्रमाणे आम्हाला पवित्र करीत आहे ।। २१ ॥
शरत् कालांतील चन्द्र जसा आपल्या कान्तियुक्त चांदण्याने सगळ्या जगाला व्यापतो तसे फुललेल्या कमलाच्या शोभेला आपले मुख धारण करीत असून आपल्या कान्तिरूपी चांदण्यानी सर्व जगाला त्याने व्यापून टाकिले आहे ॥ २२ ॥
हे प्रभो, आपल्या मुखातून अट्टाहास व हुंकार कधी बाहेर पडला नाही व आपण आपल्या दातांनी कधी ओठ चावला नाही. असे आपले मुख विद्वज्जनांना आपल्या ठिकाणचा वीतरागपणा सांगत आहे ॥ २३ ॥
हे जिनदेवा, आपल्या मुखापासून उत्पन्न झालेली व सर्व जगाला पावन करणारी जणु ही सरस्वती अज्ञानान्धकाराचा नाश करणारी असल्यामुळे प्रातःकालच्या सूर्यकान्तीप्रमाणे वाटत आहे ॥ २४ ॥
हे प्रभो, आपल्या मुखकमलावर खिळलेली ही देवांच्या डोळ्यांची पंक्ति त्यातील सुगंध सेवन करण्यासाठी आलेली जणु भुंग्यांची पंक्ति आहे असे वाटत आहे ।। २५ ॥
हे प्रभो, आपल्या मुखकमलातून बाहेर पडणारे भाषण जणु मकरन्द आहे व तो हे भव्यजनरूपी भुंगे यथेच्छ पिऊन अतृप्तियुक्त अशा आनन्दाला प्राप्त होत आहेत ।। २६ ॥
हे जिनेश्वरा, आपण एकाच बाजूला तोंड करून बसले असताही चोहीकडे आपणास मुखें आहेत असे आम्हास वाटते. हे खरोखर आपल्या तपोगुणाचे आश्चर्यकारक माहात्म्य आहे ॥ २७ ॥
__ हे जिनसूर्या, तुझे वचनरूपी किरण सर्व दिशाना व्यापीत आहेत आणि पशूच्या देखील हृदयांतील अज्ञानान्धकाराला ते नाहीसा करीत आहेत ॥ २८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org