Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-२०)
महापुराण
त्वयि भक्तिः कृताल्पापि महती फलसम्पदम् । पम्फुलीति विभो कल्पक्ष्माजसेवेव देहिनाम् ॥ तवारिजयमाचष्टे वपुरस्पृष्टकैतवम् । दोषावेशविकारोहि रागिणां भूषणादयः ॥ १५ निर्भूषमपि कान्तं ते वपुर्भुवनभूषणम् । दीप्तं हि भूषणं नैव भूषणान्तरमीक्षते ॥ १६ न मूनि कबरीबन्धो न शेखरपरिग्रहः । न किरीटादिभारस्ते तथापि रुचिरं शिरः ॥ १७ न मुखे भ्रकुटीन्यासो न दष्टो दशनच्छदः । नास्त्रे व्यापारितो हस्तस्तथापि त्वमरीनहन् ॥१८ त्वया नाताम्रिते नेत्रे नीलोत्पलदलायते । मोहारिविजये देव प्रभुशक्तिस्तवाद्भुता ॥ १९ अनपाङ्गावलोकं ते जिनेन्द्र नयनद्वयम् । मदनारिजयं वक्ति व्यक्तं नः सौम्यवीक्षितम् ॥ २०
...........
.
हे जिनदेवा, तुझ्या ठिकाणी अल्प देखील मी भक्ति केली तरीही ती मोठ्या फलसंपत्तीला वारंवार देते. जशी कल्पवृक्षाची अल्पशी सेवा केली तरीही प्राण्यांना ती मोठे फल देते ।। १४ ।।
हे प्रभो, अलंकाराना आपल्या शरीराने स्पर्श केलेला नाही असे आपले शरीर अर्थात् अलंकारादि उपाधीनी रहित आपले शरीर आपण कामादिशत्रूवर विजय मिळविलेला आहे असे आम्हास सांगत आहे. हे देवा, आभूषण-अलंकारादिक पदार्थ रागी लोकांचे दोष प्रकट करणारे विकार आहेत. अर्थात् रागी द्वेषी आदिक मनुष्यच अलंकार आपल्या शरीरावर धारण करून त्याला सजवित असतात. परंतु आपण राग, द्वेष आदिक अन्तरंग शत्रूवर विजय मिळविलेला आहे. म्हणून आपणास भूषणांनी देह सजवावा असे बिलकुल वाटत नाही ॥१५।।
___ सगळ्या जगाला आपले शरीर भूषित करीत आहे असे आपले शरीर अलंकाररहित असूनही सुन्दर आहे. बरोबर आहे की, जो अलंकार अतिशय उज्ज्वल आहे त्याला अन्य अलंकाराची अपेक्षा नसते ॥ १६ ॥
हे प्रभो, आपल्या मस्तकावर सुन्दर केशरचना नाही व आपण मस्तकावर तुराही धारण केला नाही किंवा किरीटादिकांचाही आपण स्वीकार केलेला नाही तथापि आपले मस्तक सुंदर दिसत आहे ।। १७ ।।
हे प्रभो, आपल्या मुखावर क्रोध उत्पन्न झाला नाही व क्रोधाने भुवया वर चढल्या नाहीत. आपण दातांनी ओठही चावला नाही किंवा आपला हात शस्त्र घेण्यासाठी तिकडे वळलाही नाही तरीही आपण शत्रूना ठार केले आहे ॥ १८ ॥
हे प्रभो, निळया कमळाच्या पाकळीप्रमाणे दीर्घ असे आपले दोन डोळे मोहशत्रूला जिंकतेवेळी बिलकुल लाल झाले नाहीत. हे देवा, आपल्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य आहे असे दिसते ॥ १९ ॥
हे जिनेन्द्रा, आपले दोन डोळे कटाक्ष फेकून पाहत नाहीत व आपल्या डोळ्यांचे जे शान्त अवलोकन आहे ते आम्हाला मदनशत्रु आपण जिंकला आहे असे स्पष्ट सांगत आहेत ॥ २० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org