Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२)
( २५-९
स्तोष्ये त्वां परमं ज्योतिर्गुणरत्नमहाकरम् । मतिप्रकर्षहीनोऽपि केवलं भक्तिचोदितः ॥ ९ त्वामभिष्टुतां भक्त्या विशिष्टाः फलसंपदः । स्वयमाविर्भवन्तीति निश्चित्य त्वां जिन स्तुवे ॥ १० स्तुतिः पुण्यगुणोत्कीर्तिः स्तोता भव्यः प्रसन्नधीः । निष्ठितार्थो भवान् स्तुत्यः फलं नैःश्रेयसं सुखम् ।। इत्याकलय्य मनसा तुष्टृषं मां फलार्थिनम् । विभो प्रसन्नया दृष्ट्या त्वं पुनीहि सनातन ॥ १२ मामुदाकुरुते भक्तिस्त्वद्गुणैः परिचोदिता । ततः स्तुतिपथे तेऽस्मिन्लग्नः संविग्नमानसः ॥ १३
महापुराण
भोग, उपभोग व अनन्तवीर्य या नऊ लब्धि घातिकर्माच्या क्षयामुळे केवलीना प्राप्त होतात ) मोठी खाण जशी रत्नांच्या संचयाने भरलेली असते तसे आदिभगवान् उत्पन्न झालेल्या अनन्तज्ञानादिक गुणरत्नांनी भरलेले होते. आदिभगवान् अचिन्त्य अनंत गुणांच्या वैभवाने युक्त होते व ते जगाचे अधिपति होते. चार प्रकारच्या श्रमणसंघाने ते घेरलेले होते ( मुनि, ऋषि, यति आणि अनगार ). त्यामुळे ते भद्रशाल, सौमनस, नंदनवन व पांडुकवन अशा चार वनानी घेरलेल्या मेरूप्रमाणे भासत होते. अशोकवृक्ष, पुष्पवृष्टि, दिव्यध्वनि, चौसष्ट चामरे, इत्यादि आठ प्रातिहार्यांनी युक्त होते व गर्भ, जन्मादि पंचकल्याणानी ते शोभत होते. तसेच जन्माचे दहा अतिशय, केवलज्ञानाचे दहा अतिशय व देवकृत चौदा अतिशय अशा चौतीस अतिशयांनी प्रभु युक्त होते. त्यामुळे ते त्रैलोक्यपति होते. अशा त्या प्रभूना ज्याचे हजार नेत्र विकसित झाले आहेत व ज्याचे अन्तःकरण आनंदाने भरले आहे अशा सौधर्म इन्द्राने पाहिले व एकाग्रचित्त होऊन त्याने त्यांची स्तुति करण्यास प्रारम्भ केला ॥ ३-८ ॥
हे आदिभगवन्ता, आपण उत्कृष्ट केवलज्ञानरूपी ज्योतीने युक्त आहात व गुणरूपी रत्नांची मोठी खाण आहात. हे नाथ, माझ्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकर्ष झालेला नाही तथापि केवळ मी भक्तीने प्रेरित होऊन आपली स्तुति करणार आहे ॥ ९॥
हे जिनराज, जे भक्तीने आपली स्तुति करतात त्यांना विशिष्ट फळें, विशिष्ट संपदा इन्द्रपद, चक्रवर्तीपद आदिक वैभवे प्राप्त होतात. या संपदा आपण होऊन प्रकट होतात मिळतात असे निश्चयाने समजून मी आपली स्तुति करीत आहे ॥ १० ॥
हे जिनदेवा, पवित्र गुणांचे वर्णन करणे त्याला स्तुति म्हणतात. ती करणारा तो भव्य स्तोता होय. तो प्रसन्न बुद्धीचा होतो. कर्मक्षयरूपी कार्य आपण केले आहे म्हणून आपण स्तुत्य आहात व या स्तुतीचे फल निर्वाण-मोक्ष सुखाची प्राप्ति होणे हें आहे ।। ११ ।।
असे मनाने मी जाणतो व फलाची इच्छा करणाऱ्या स्तुति करून फल इच्छिणान्या मला हे प्रभो, अनादिनिधन आपण आहा. मला प्रसन्न दृष्टीने पाहून पवित्र करा ।। १२ ।।
आपल्या गुणांनी प्रेरिलेली भक्ति मला स्तुति करण्याच्या कार्यात प्रोत्साहन देत आहे. ऐहिक फलाविषयी मी निःस्पृह होऊन आपल्या स्तुतिमार्गांत प्रवृत्त झालो आहे ।। १३ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org