________________
(३०)
SORRORISbstituating
3015
प्राचीन इतिहास, धर्म आणि दर्शनांच्या संशोधकाने ह्या विषयावर जर काही प्रयत्न केला तर सारस्वत क्षेत्रामध्ये फार मोठी उपलब्धी होऊ शकते.
११. जैन परंपरेचे सात निव श्रमण भगवान महावीरांच्या काळात जैन, श्रमण परंपरेमध्येही अनेक निह्नव होते. ह्यात सात निलव मुख्य आहेत, जे यत्किंचित सैद्धांतिक भेदामुळे जैन संप्रदायातून वेगळे झाले. त्यांना निह्नव म्हटलेले आहे. श्रमण भगवान महावीरांच्या तीर्थामध्ये सात प्रवचन निहव होते असे मानले जाते.१२ बहुतरवाद
ह्या वादाचे संस्थापक 'जमाली' मानले जातात. ते भगवान महावीरांचे जावई होते, ज्यांनी पाचशे पुरुषांसमवेत दीक्षा घेतली. त्यांनी ध्यान आणि तपाची उत्कृष्ट आराधना केली. परंतु त्यांचा भगवान महावीरांच्या 'चलयमाने चलीये, उदीर्यमाने उदिरिये' या वचनाबरोबर विरोध झाला. जमालीचे मत होते की भगवान जे क्रियमानाला 'कृत' म्हणतात ते बरोबर नाही, क्रियमान अकृत आहे. कार्य केले जात आहे पण केलेले नाही हा सिद्धांत बरोबर आहे. भगवान क्रियमानाला कृत म्हणत होते हा सिद्धांत जमलिला बरोबर वाटला नाही. जमलीच्या सिद्धांताला बहुतरवाद म्हटले गेले कारण ते बहु म्हणजे फार वेळा नंतर अर्थात कार्याची निष्पत्ती कार्य पूर्ण झाल्यानंतर मानत होते. जीव प्रादेशिक वाद
ह्या वादाचे संस्थापक 'तिष्यगुप्त' दुसरे निह्नव मानलेले आहेत. त्यांचे गुरू 'आचार्य बसु' चतुर्दश पूर्वधर होते. तिष्यगुप्त गुरूजवळ आत्मप्रवाद पूर्व वाचत होते. त्यात भगवान महावीर आणि गणधर गौतमस्वामींचा वार्तालाप आलेला आहे. गौतमस्वामीने भगवान महावीरांना विचारले की, "जीवाच्या एक प्रदेशाला जीव म्हणतात का ?" भगवान महावीरांनी उत्तर दिले, "नाही." तेव्हा गौतमस्वामींनी पुन्हा विचारले, "दोन, तीन अथवा संख्यात कमी जीवाच्या प्रदेशाला जीव म्हटले जाते का ?" भगवान म्हणाले, "गौतम, तसे म्हणता येणार नाही. एक प्रदेश जरी कमी असला तरी जीव म्हणता येणार नाही परंतु असंख्यात प्रदेशमय चैतन्य पदार्थाला 'जीव' म्हणणे योग्य आहे.'' हे ऐकून तिष्यगुप्तांना शंका येते. त्यांनी हा सिद्धांत मान्य केला की, शेवटच्या प्रदेशाशिवाय जीवाचे बाकीचे प्रदेश जीव नाही म्हणजे शेवटचा प्रदेशच वास्तविक
RE