________________
(४०)
जैन श्रमण आपल्या सुविधेनुसार इकडे तिकडे निघून गेले. ह्या कारणाने आगम शास्त्राची दुर्दशा झाली. आगमज्ञानाची साखळी विस्कळीत होऊ लागली. दुष्काळ संपल्यावर आ. स्थूलभद्रांनी पाटलीपुत्रामध्ये जैन श्रमणांचे एक संमेलन भरवले. ज्याच्यात विशिष्ट आचार्य आणि बहुश्रुत मुनी एकत्रित झाले. अकरा अंग शास्त्रांचे व्यवस्थित संकलन केले गेले. बाराव्या दृष्टिवादाचे ज्ञाता एकमात्र भद्रबाहु स्वामी होते. ते त्यावेळी नेपाळमध्ये महाप्राण ध्यानाची साधना करत होते.
पूर्वांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जैन संघाद्वारे कित्येक साधूंना स्थूलभद्राबरोबर नेपाळमध्ये पाठवले गेले. संघाच्या विनंतीला मान्य करून भद्रबाहूंनी बाराव्या अंगाची वाचना देणे स्वीकारले. मुनी स्थूलभद्रांनी दहा पूर्वापर्यंत अर्थसहित वाचना घेतली.. अकराव्या पूर्वाची वाचना चाललेली असताना स्थूलभद्र मुनींनी सिंहाचे रूप घेतले आणि आपल्या साध्वी भगिनीला चमत्कार दाखवले. भद्रबाहू स्वामींना जेव्हा हे माहीत पडले तेव्हा त्यांनी पुढे वाचना देणे बंद केले. परंतु संघ आणि स्थूलभद्र मुनींच्या अत्यंत आग्रहाने आणि पुन्हा पुन्हा विनवणी केल्यावर भद्रबाहूंनी मूळ रूपात शेवटच्या चार पूर्वांची वाचना दिली. २७
सारांश हा आहे की प्रथम वाचनेच्यावेळी चार पूर्व बगळता बारा अंग श्रमण संघाच्या हाती लागले कारण स्थूलभद्र जरी सूत्ररूपात चौदा पूर्वाचे ज्ञाता होते परंतु त्यांना चार पूर्वांची वाचना दुसऱ्यांना देण्याची आज्ञा नव्हती. म्हणून स्थूलभद्र पाठाच्या दृष्टीने अंतिम श्रुत केवली होत, अर्थाच्या दृष्टीने अंतिम श्रुतकेवली भद्रबाहूच होते. पाटलीपुत्राच्या संमेलनामध्ये हे आगम संकलनाचे कार्य झाले म्हणून ह्याला "पाटलीपुत्र वाचना" म्हटले जाते.
उत्तरोत्तर पूर्वाच्या विशेष पाठकांचा -हास होऊ लागला. ग्रहण करणे, मनन करणे आणि अनुप्रेक्षा करणे ह्याच्या अभावाने सूत्राचे ज्ञान लुप्त होऊ लागले. लुप्त होण्याचा हा क्रम पुढे वाढतच गेला.
आगम संकलनाचा दुसरा प्रयत्न वीर निर्वाण ८२७ ते ८४० मध्ये आगमाला सुव्यवस्थित करण्यासाठी एक प्रयत्न झाला. आर्य स्कंदिलच्या नेतृत्वामध्ये मथुरेमध्ये दुसरे संमेलन झाले. ह्याकाळात सुद्धा पहिल्यासारखा भीषण दुष्काळ पडल्याने आगमाची फार क्षती झाली. या संमेलनामध्ये ज्याने जे स्मृतीत होते त्याच्या आधारावर कालिक श्रुताच्यारूपात संकलन केले. हे कार्य मथुरेत झाले म्हणून याला 'माथुरी वाचना'
SAT
212 AP
ZAPAD
-