________________
(२०७)
याची मुख्य चार कारणे आहेत - क्रोध, लोभ, भय व हास्य. क्रोधामुळे विवेकहीन होतो. लोभाने अंध झालेला असत्यालाच आपल्या साध्याच्या सिद्धीचे मानतो. भयामुळे दुष्कर्माच्या दंडापासून वाचण्यासाठी असत्याचा आसरा घेतो.
यीमध्ये असत्याचा प्रयोग साधारण समजला जातो.२७ खोटी साक्ष देणे असत्य आहे. सत्याच्या विरोधी असे असत्य आहे.
मत शब्द प्रशंसावाचक आहे. जे सत् नाही ते असत् आहे. 'असत्' याचा अप्रशस्त आहे. तात्पर्य हे आहे की जो पदार्थ नाही त्याचे कथन करणे त्याला असत्य म्हणतात. ऋत् चा अर्थ 'सत्य' आहे आणि जे सत्य-ऋत नाही ते अनृत
आहे. २८
आपला विषय 'भावना' आहे. मनात जे असत्यमुलक विचार चालतात. जे चिंतन चालते ते असत्य चिंतन मनुष्याकरता व त्यामुळे आत्म्याचे पतन कशाप्रकारे होते त्याची हेयता समजण्यासाठी ह्या भावनेच्या स्वरूपाला जाणून घेणे आवश्यक आहे.
जोपर्यंत जीवाच्या मागे कर्माचे आवरण आहे तोपर्यंत त्याच्या वाणी, विचार व वर्तनामध्ये अप्रशस्तता, अशुभता असते. त्याला दूर करण्याचा पुरुषार्थ जीव स्वतःच करू शकतो. परंतु जगात जगणारा प्राणी भौतिक सुखाच्या लालसेमुळे मनात जे काही संकल्पविकल्प धारण करतो ते असत्य विचार स्वार्थमूलक असतात.
___ असत्यानुबंधी भावनेत जीव विचार करतो की मी असत्य आणि चातुर्याच्या बळावर लोकांना फसवून खूप धनसंग्रह करून घेईन, मनःकल्पित अनेक शास्त्रांची रचना करून स्वतःचे मत चालविन. ते शास्त्र सत्य आहे की असत्य, दयामय आहे की क्रूर याची पर्वा करणार नाही. लोकांना गोड गोड बोलून फसवून, मोहित करून त्यांच्याजवळून सुंदर कन्या, रत्न, धन-धान्य, घर इत्यादी घेऊन टाकीन. तसेच माझे जीवन सुखी कसे होईल एवढाच विचार करीन इत्यादी विवधि प्रकारे असत्य विचाराचा मनात उद्भव होणे असत्यानुबंधी भावना आहे. असत्यानुबंधी भावना रौद्रध्यानचा दुसरा भेद आहे.
असत्यभावनेमुळे जगामध्ये वेगवेगळे दोष पसरू शकतात म्हणून असत्याला सर्वजण वाईट समजतात.
असत्यता कोठे नाही हा प्रश्न आहे. न्यायालयात तर असत्य फार प्रचलित आहे. कित्येकांचा तर हा धंदाच आहे. अशा व्यक्तींना थोडेसे पैसे देऊन त्यांच्याकडून काहीही बोलून/ वदवून घेता येते. अशा लोकांना भविष्याच्या दुष्परिणामांचे ध्यान राहत नाही.