________________
(
39020
MORE
LEM
(२५९)
साधंचा अवर्णवाद - हे साधू असहिष्णू वृत्तीचे असतात, हे पराभव किंवा न करू शकत नाहीत, असा अपमान होऊ लागला तर ते त्या स्थानाला सोडून तात, हे स्वभावतःच निष्ठुर असतात, हे क्षणामध्ये हृष्ट किंवा तुष्ट होतात, यांचे
असते. अत्यंत खुशामती करून, स्तुती करून हे गृहस्थांना खुश करतात कांबळे आणि भांडी यांचा पुष्कळ संचय करतात, हे अत्यंत लोभी असतात. प्रकारच्या असत्य कथनाचा साधूंचा अवर्णवाद यामध्ये समावेश होतो. हा पतनाचा आहे. ह्या अधोगतीच्या मार्गापासून साधकाने नेहमी सावध राहिले पाहिजे.१३८
५) मायावादी - जो बगळ्याप्रमाणे आपल्या दूषित परिणामांना लपवितो आणि पन्यांच्या ज्ञान, दर्शनादी गुणांना ईर्ष्या किंवा द्वेषामुळे नष्ट करण्याचा किंवा लपविण्याचा प्रयत्न करतो, जो चोराप्रमाणे शंका घेतो, अप्रत्यक्षरीत्या चोरी करण्याची वृत्ती असते. मायावादी आत्म्याच्या निर्मळ स्वरूपाला कलुषित करतो.१३९
बृहत्कल्पात मायावादी हा पाचवा भेद आहे. उत्तराध्ययन सूत्रात मायावादी न म्हणता धर्मसंघाचा अवर्णवाद म्हटले आहे. तेथे ही मायावी शब्द आहे पण तेथे ह्या पाच प्रकारच्या अवर्णवाद करणाऱ्याला मायावी विश्लेषण लावले आहे. मायावाद असा वेगळा भेद केलेला नाही.
___ वरील विवेचनावरून स्पष्ट होते की किल्विषी भावनेचा मुख्य संबंध निंदा आणि कपट यांच्याशी आहे.
जो माणूस आपल्या आराध्य पुरुषांची निंदा करतो. लोकामध्ये त्यांचा अवर्णवाद सरतो. कपटपूर्वक छिद्रान्वेषण करतो त्यांच्या उद्बोधनाचा अपमान करतो, तिरस्कार करतो, त्यास किल्विषिक भावनेचा म्हटले आहे. किल्विषक भावनेची काही अन्य कारणे शास्त्रात आहेत -
तवतेणे, वयतेणे, रेवतेणे य जे गरे ।
आचार भावतेणे य कुव्वइ देवकिब्विसं ॥१४० तपाची चोरी व्रत. रुप. आचार इ. ची चोरी करणारा किल्विषी देव रूपात उत्पन्न होतो.
SAHawali
तपाची चोरी म्हणजे स्वतः तप न करता दसऱ्या तपस्वीच्या नावाखाली स्वत:ची पूजा प्रतिष्ठा वाह-वाह करवून घेणे. कोणी साधूला विचारले की "महाराज आपणामध्ये