________________
(२८३)
साधू शकता. मुमुक्षू त्याला का धारण करीत नाही. ७
शुभ
भावनेचा प्रभाव प्रसन्नचंद्र राजर्षीच्या दृष्टांतानेही समजू शकतो. आर्त, रौद्र ध्यानामध्ये तल्लिन झालेले पूज्य श्री प्रसन्नचंद्रराजर्षी यांना नरकात जाऊ न देणाऱ्या आणि शुक्लध्यानापर्यंत पोहचवून मोक्षप्राप्ती करविणारी भावनाच आहे. सर्व सिद्धी प्राप्त करविण्यात भावना समर्थ आहे. अर्थात भावना सर्व प्रकारची ऋद्धी, सिद्धी प्रदान करणारी आहे. आणि उत्तम समाधी म्हणजे चित्ताची स्थिरता सुद्धा भावना प्रकट करते. ह्या भावना चिंतामणी रत्नासारख्या आहेत, कारण चिंतामणी रत्न मनात चिंतिलेला पदार्थ देतात तशाच प्रकारे भावनाही मनोवांछित अथवा इष्टाला देणाऱ्या आहेत. येथे प्रसन्नचंद्र राजर्षीचा वृत्तांत दिला जात आहे.
पोतनपुर नगरीमध्ये ‘प्रसन्नचंद्र राजा राज्य करत होते. एकदा श्रमण भगवान महावीर स्वामी त्या नगरीत 'मनोरम' नावाच्या उद्यानामध्ये आले. प्रसन्नचंद्र राजर्षी चतुरंगी सेनेबरोबर मोठ्या थाटाने प्रभूंचे दर्शन करण्यासाठी गेले. प्रभूंचा उपदेश ऐकून संसारापासून विरक्त झाले. लहान वयाच्या कुमाराला राजगादीवर बसवून स्वतः दीक्षित झाले. अत्यंत उग्र तपश्चर्येबरोबरच सूत्रार्थाचा अभ्यास करून प्रसन्नचंद्र राजर्षी शास्त्रात पारंगत झाले. विहार करता करता एकदा ते प्रभू महावीरांबरोबर राजगृहामध्ये आले. त्यावेळी ते राजर्षी राजगृह नगरीच्या बाहेर एकांतजागी एका पायावर उभे राहून दोन्ही हात वर करून सूर्याची आतापना घेत होते. राजर्षी ज्यावेळी निर्मळ ध्यानात मग्न होते त्याचवेळी सहपरिवार राजा श्रेणिक प्रभूंच्या दर्शनासाठी त्याच मार्गाने चतुरंगी सेनेसहित जात होते. त्या सेनेमध्ये एक सुमुख नावाचा सैनिक शिपाई प्रसन्नचंद्र राजर्षीला ध्यानस्थ अवस्थेत पाहून म्हणाला, 'अहो, हे ध्यानी मुनी धन्य आहेत, त्यांच्यासाठी स्वर्ग, मोक्ष अथवा महाऋद्धी काही दूर नाही. अशाप्रकारे बोलणाऱ्या शिपायाला कर्माने आणि नावाने दुष्ट असणारा दुर्मुख नावाचा शिपाई म्हणाला की, ‘हे ध्यानी आणि तपस्वी कसे ? हे तर अतिशय अविचारी अधर्मी आहेत कारण ह्यांनी आपल्या लहान वयाच्या मुलाला राजगादीवर बसवून दिक्षा घेतली. लहान मुलाची सुद्धा ज्याला दया नाही त्याला तपस्वी कसे म्हणता येईल ? लहान मुलाला राजगादी दिल्यानंतर राणी कोठे तरी निघून गेली आहे. मंत्री शत्रू राजाला जाऊन मिळाले आहेत. शत्रूने नगरीला घेरले आहे. नगरातील प्रजासुद्धा दुःखी झाली आहे. म्हणून राजाने दीक्षा घेऊन खूप अनर्थ केला आहे. आणि आता ध्यानात मग्न आहे, पाखंडी आहे, ढोंगी आहे. अशाप्रकारे उद्धटपणे बोलत होता. दुर्मुखचे शब्द प्रसन्नचंद्र राजर्षीच्या कानात पडले