Book Title: Jain Darshan Bhavna Part 01
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 397
________________ (३८३) अनावश्यक आहे त्याची इच्छा कधीच करू नये. महान तत्त्वज्ञानी सॉक्रेटीस यांना त्यांचे शिष्य एका मोठ्या दुकानात घेऊन गेले. त्या दुकानात कला कारागिरीच्या अनेक सुंदर वस्तू होत्या. सॉक्रेटीस यांनी दुकानात फिरून अनेक वस्तू बघितल्या, प्रशंसा केली प्रसन्न झाले आणि दुकानातून बाहेर आले. शिष्यांनी विचारले 'हे सर्व पाहून आपल्या मनात कोणते विचार आले ?' सॉक्रेटीस यांनी सांगितले की, आपल्या देशाचे कलाकौशल्य पाहून आनंद झाला. शिष्यांनी विचारले, “आपणास कोणतीही वस्तू घेण्याची इच्छा झाली नाही का ?" सॉक्रेटीस यांनी म्हटले की, मला ज्या वस्तूची आवश्यकता नाही ती घेण्याची इच्छा का होईल ? शिष्य सुंदर वस्तू घेण्याची इच्छा होणे स्वाभाविकच आहे. सॉक्रेटीस म्हणाले, " आपल्या देशात वैद्य फार चांगली औषधे तयार करतात परंतु ज्याची आवश्यकता नाही असे औषध आपण कितीही चांगले असले तरी घेणार का ? नाहीच घेणार. " म्हणाला - लहानशा उदाहरणाद्वारे खूप मोठे तत्त्वज्ञान समजाविले. सॉक्रेटिसने तत्त्वज्ञानाला जीवनात उतरवले होते. ग्रंथकार म्हणतात 'यतस्व स्वहिताप्तये' आत्महितासाठी प्रयत्न कर, आत्महित इच्छारहित झाल्याने होते. अनुरागात्मक इच्छा नष्ट झाल्याने होते. ज्ञानी पुरुष पदार्थाचा उपभोग अवश्य घेतात. परंतु त्याबद्दलची आसक्ती ठेवत नाहीत. पदार्थ आसक्तिरहित भोगल्याने जो कर्मबंध होतो तो रुक्ष होतो आणि आसक्तीने पदार्थाचा उपभोग घेतला तर त्याचा स्नेहबंध होतो. त्याचे विपाक अथवा दुःखरूपी फळ भोगावे लागतात. ज्ञानी निर्लिप्त आहे. आध्याय श्री यशोविजयजी द्वारे लिखित 'ज्ञानसार'चे "अलिप्तो निश्चयेनात्मा लिप्तश्च व्यवहारातः " १७९ हे प्रसिद्ध वाक्य आहे. निश्चय दृष्टीने आत्मा अलिप्त असतो. व्यवहारभाषेत त्याला लिप्त म्हणतात. ज्ञानी कर्मामध्ये राहत असला तरी त्याने लिप्त होत नाही. जसे कमळ चिखलापासून निर्लिप्त राहते, आकाश चिखलाने लिप्त होत नाही तसेच संसाराने, कर्माने ज्ञानी लिप्त होत नाही. चिखलात सुवर्ण आणि लोखंड दोन्ही पडले आहे. दोघांची प्रकृती वेगवेगळी आहे. चिखलात पडलेल्या सोन्याला गंज लागत नाही. ते एकदम स्वच्छ राहते, परंतु लोखंडाला गंज लागतो. जशी सुवर्ण आणि लोखंडाची प्रकृती वेगळी असते तशी ज्ञानी आणि अज्ञानी मनुष्याची प्रकृती वेगळी असते. ज्ञानी संसारात राहूनही सुवर्णाप्रमाणे निर्लिप्त राहतो.

Loading...

Page Navigation
1 ... 395 396 397 398 399 400 401 402 403 404 405 406 407 408