________________
(३८९)
आहे. मी शुद्ध आणि शुचिरूप आहे. हे अशुद्ध आणि अशुचिरूप आहे. मी अजर-अमर आहे. हे क्षणभंगुर आहे, मी अनंत, ज्ञान इत्यादी गुणाने समृद्ध, सिद्धस्वरूपी आहे. हे जड आहे. अशाप्रकारे ह्यांचा आणि माझा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. आता ह्या 'अन्य'चा त्याग करून एकत्व धारणा करणे हेच माझ्यासाठी योग्य आहे. अशाप्रकारे विचार करून संसाराच्या समस्त बंधनाचा त्याग करून वीतराग भावाचा अवलंब केला पाहिजे.
___ ज्याप्रमाणे वादळ विस्कळीत झाल्यावर सूर्य आपल्या स्वाभाविक प्रकाशाने दैदिप्यमान होतो त्याचप्रमाणे कर्माचे आवरण दूर झाल्यावर आत्म्याचे निजगुण, ज्ञान इत्यादी प्रकाशित होऊ लागतात आणि आत्मा 'स्व' स्वरूपाला प्राप्त होतो.
___ज्ञानप्रकाशाच्या आलोकात जीव विचार करतो - मी कोण आहे ? एक आहे की अनेक आहे ? दिसायला तर एकाच शरीराचा धारक आहे परंतु जर एक मानले तर अनेकता कशी शक्य होईल ? आई-वडील म्हणतात की हा माझा पुत्र आहे तर काय मी पुत्र आहे ? बहीण म्हणते की हा माझा भाऊ आहे तर मी काय भाऊ आहे ? कोणी पती, कोणी पिता, कोणी काका, कोणी मामा तर कोणी जावई इत्यादी संबोधून मला बोलावतात तेव्हा मला विचार येतो की वास्तविक मी कोण आहे ? काय आहे ? कोणाचा आहे ? आश्चर्य आहे की आपला शोध करणे आपल्यालाच मुश्किल होत आहे. स्वतःच स्वतःला ओळखण्यात असमर्थ होत आहोत.
परंतु ज्यांना भेदज्ञान होते त्यांना प्रतीति येते की, हा सर्व कर्माचा खेळ आहे. परमार्थदृष्टीने मी पुत्र नाही. पिता नाही किंवा कोणी अन्य नाही. कोणी माझे नाही किंवा मी कोणाचा नाही. जर मी ह्या नावाचा असतो तर नेहमी त्याच रूपात राहिलो असतो. अशाप्रकारे विचार केल्याने सर्व अन्य भाव मिथ्या प्रतीत होतात.
ज्याप्रमाणे नट नाट्यशाळेत 'स्त्री'चे रूप घेतो आणि पुरुषाचे सुद्धा रूप घेतो तसाच अभिनय करतो. परंतु आंतरीक दृष्टीने पाहिले तर तो नट तसा नाही. तो राजा नाही किंवा राणी नाही, संयोग नाही किंवा वियोग नाही. तो ह्या सर्व भावाहून अन्य आहे, वेगळा आहे. केवळ दर्शकांना दाखविण्यासाठी, हसविण्यासाठी, रडविण्यासाठी आणि फसविण्यासाठी अनेक भाव दर्शवतो. परंतु अंतरात तो त्या सर्व भावाहून वेगळा आहे.
त्याचप्रमाणे संसाररूपी नाट्यशाळेत चैतन्यरूपी नटाने कर्माच्या निमित्ताने उच्चनीच, एकेंद्रियापासून पंचेद्रियांपर्यंत, चांडाळापासून चक्रवर्तीपर्यंतचे रूप धारण करून त्या