________________
(३९१)
आहे, हे माझे आहे' अशा प्रकारे मोहामुळे 'पर' द्रव्यात आपलेपणाचा अध्यवसाय करीत असतो. दुसरा नाही. ज्याला 'स्व-पर'चे भेदज्ञान नाही तो 'पर' द्रव्यात अहंकार आणि ममत्व ठेवतो. ह्या 'पर' द्रव्यात प्रवृत्ती असण्याचे कारण भेदज्ञानाचा अभाव आहे आणि 'स्व' द्रव्यात प्रवृत्ती असण्याचे कारण भेदज्ञानच आहे.
मी 'पर'चा नाही, 'पर' माझे नाही, मी एक ज्ञानस्वरूपी आहे. अशाप्रकारे जो ध्यान करतो तो ध्याता अनात्म्याला सोडून आत्म्यालाच आत्मरूपात ग्रहण करतो आणि 'पर' द्रव्याच्या भिन्नत्वाच्या ज्ञानामुळे शुद्धात्मभावाला प्राप्त होतो.१८५
परंतु जर कोणाला शरीरादीबद्दल परमाणुमात्रही मूर्छा राहत असेल तर ता जरी सर्व आगमाचा ज्ञाता असला तरी त्याला सिद्धी प्राप्त होत नाही.
अर्थात जो शरीर इत्यादी अन्य पदार्थांच्या मोहकलंकरूपी खिळ्याने बांधला गेलेला आहे तो कर्मातून सुटू शकत नाही, सिद्ध होऊ शकत नाही. सर्व बंधनातून सुटण्यासाठी 'स्व-पर'चे भेदज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. भेदज्ञानामुळे 'पर'ची परिहेयता समजून त्याचा त्याग आणि 'स्व'ची सार्थकता समजून त्याची साधना केल्याने जीव बंधनातून मुक्त होऊ शकतो.
जैनदर्शनात सम्यग्दर्शन, सम्यक्ज्ञान आणि सम्यक् चारित्र ह्या त्रिवेणी संगमाला मोक्षमार्ग अथवा बंधन-मुक्तीचे साधन सांगितले आहे. त्याचा अभिप्राय 'स्व' स्वरूपावर विश्वास ठेवणे, 'स्व' स्वरूपाचे ज्ञान घेणे आणि 'स्व' स्वरूपामध्ये स्थिर होणे ज्यामुळे पूर्णतेला प्राप्त होऊ शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो असा आहे.
पाश्चात्य विचारक टेनिसने, एका जागी लिहिले आहे -
"Self reverence, self knowledge, self-control these three alone lead life of sovereign power."
अर्थात आत्मविश्वास, आत्मज्ञान आणि आत्मसंयम हे तीन आत्म्याला परमशांती संपन्न करणारे आहे. १८७
सम्यग्दर्शन आणि सम्यक् ज्ञान याचे तात्पर्य सर्वप्रथम आत्मचिंतनाद्वारे 'स्व स्वरूपाचे ज्ञान करून घेऊन त्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणे आहे. जोपर्यंत 'स्व स्वरूपाचे ज्ञान आणि 'स्व' स्वरूपामध्ये श्रद्धा, विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपात स्थिर होण्याचे प्रयत्न निष्फळ होतात.