Book Title: Jain Darshan Bhavna Part 01
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 401
________________ (३८७) आहे. त्यात पुन्हा पुन्हा जन्म-मरणाच्या तरंग उठत राहतात आणि ते जन्म-मरण आणि दुःख ‘पर' वस्तूच्या ममतेमुळे, राग इत्यादी दोषांमुळे आणि दृष्कृत्याच्या आचरणाने प्राप्त होतात. अनंत शक्तींचा मालक आत्म्याला हे 'पर' पदार्थ काय मात करू शकतील ? कधीच नाही. परंतु जसे मातंग हत्ती समुद्रात राहणाऱ्या, दोरीप्रमाणे लांब असणाऱ्या जलचर जंतूंनी घेरले जातात अर्थात हत्तीच्या पायाला हे लांब जलचर जंतू जखडून टाकतात. तेव्हा जंतूच्या बंधनाने बांधला गेलेला बलवान हत्ती सुद्धा समुद्राच्या बाहेर निघू शकत नाही. तशीच स्थिती ममतेच्या बंधनाने बांधल्या गेलेल्या व्यक्तीच्या जीवनाची आहे. तो ममतेच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करतो परंतु सुटू शकत नाही. परंतु ज्याप्रमाणे हत्तीला जलचर जंतूच्या बंधनातून मुक्त करायचे असेल तर जलकांत मणी त्यांच्याजवळ टाकल्याने पाणी दुभागले जाते आणि हत्तीच्या पायाच्या जवळची जागा जलरहित होते. पाण्याच्या अभावाने ते जलचर जंतू तिथे राहू शकत नाही. म्हणून ते हत्तीच्या पायावरून उतरून पाण्यात निघूत जातात आणि हत्ती बंधनातून मुक्त होतो. त्याचप्रमाणे भगवत् शरण आणि भगवत् प्रेम जीवाला पर वस्तूच्या रागाने आणि ममत्वापासून दूर करते. त्यामुळे जीव पर वस्तूच्या बंधनातून मुक्त होतो.१८१ हा संसार तर पक्षांचा मेळा आहे, पक्षी वृक्षावर आपापल्या स्वार्थामुळे येतात आणि जेव्हा पाने गळून जातात तेव्हा त्या वृक्षावरून उडून जातात, आणि हिरव्या वृक्षावर जाऊन बसतात. ज्ञानी अशा स्वार्थी संबंधांचा राग करीत नाहीत कारण ते समजतात पर u AUTAppscsielastis की, "बाजीगर जब ख्याल रचावे लोक होवे बहु भेळा बाजी भयासु सब भग जावे, जैसाजीव अकेलारे प्राणी"१८२ जरी जगातल्या सर्व वस्तू प्राप्त झाल्या, हजारो लोकांबरोबर स्नेहबंध निर्माण झाले तरी आयुष्य पूर्ण होताच सर्व खेळ संपून जातात. बरोबर काहीच जात नाही. जड पदार्थात जे आसक्त राहतात त्यांच्यावर नेहमीच संकटे कोसळतात. जे विरक्त आहेत तेच सुखी आहेत. तेच शांतीने जीवन जगू शकतात.१८३ विरक्ती प्राप्त करण्यासाठी सत्संगती अतिआवश्यक आहे. परंतु आज जीवाची अवस्था दारूच्या नशेत उन्मत्त झालेल्या व्यक्तीसारखी झाली आहे. ज्याप्रमाणे मोठा विद्वान नेहमी शुद्ध, पवित्र राहणारा पुरुष दारूच्या नशेत अत्यंत घाणेरड्या उकीरड्यात लोळताना असा आनंदित होतो की जसे मुलायम गादीवर लोळताना आनंद व्हावा. तसेच गटाऱ्यातील हवेला सुंगधित

Loading...

Page Navigation
1 ... 399 400 401 402 403 404 405 406 407 408