________________
(३८८)
बागेतील हवेत फिरण्यासारखे समजतो. कोणी त्या घाणीपासून लांब जावयास सांगितले तर तो सांगणाऱ्याला मूर्ख समजून शिव्या देऊ लागतो. परंतु तो दारूडा, जेव्हा दारूच्या नशेतून मुक्त होतो तेव्हा स्वतःची दुर्दशा पाहून लज्जित होतो आणि कोणी काही सांगण्यापूर्वीच तेथून निघून जातो. त्याचप्रमाणे जीवरूपी, पवित्र आणि ज्ञानी पुरुष मोहमदिरेच्या नशेमुळे भोगरूपी, अपवित्र कर्मरूपी उकीरड्यात लोटांगण घेताना आनंद मानतो. तो विषयभोगांपासून विरक्त आणि सद्बोध देणाऱ्यांना मूर्ख समजून उपदेशाचा अनादर करतो. परंतु जेव्हा मोहाची नशा उतरते तेव्हा तोच जीव संत-समागम इत्यादी प्रसंग प्राप्त होताच जागृत होतो आणि अज्ञानावस्थेत केलेल्या कर्मासाठी पश्चाताप करून तत्काळ विषयांपासून विरक्त होऊन भेद-विज्ञानाद्वारे 'पर' पदार्थाची आसक्ती सोडून देतो आणि आत्मभावनेत मग्न होतो.
आत्मभावनेत रत होण्यासाठी चार वस्तूंची आवश्यकता आहे.
१) ज्ञान-जीव ज्ञानामुळे कर्मापासून अलिप्त होण्याची विधी जाणतो. आणि ज्ञानामुळेच त्याच्यात कर्तव्यपरायण होण्याची शक्ती येते.
२) दर्शन - सम्यग्दर्शन मूळाप्रमाणे आहे कारण श्रद्धाच सद्गुणांना राहण्याचे स्थान आहे.
३) चारित्र - संयमरूपी क्षारच कर्ममळाला फाडून दूर करणारा आहे. ४) तप - तपस्यारूपी अग्नी कर्ममळाला जाळण्यासाठी समर्थ आहे.
ह्या चार पदार्थांचा योग मिळाला आणि औदारीक शरीररूपी द्रव्य, आर्यक्षेत्र, चौथा आरा इत्यादी काळ आणि भव्यत्व रूपी भावांचा संयोग मिळाल्यानंतर यथाविधी साधना केल्याने अनादीकाळाच्या कर्ममळाला नष्ट करून आत्मा आपल्या 'स्व' स्वरूपाला प्राप्त करू शकतो.
जसे लहानपणापासून शेळ्यांमध्ये राहिलेला सिंहाचा छावा स्वतःला शेळीच समजतो परंतु वनामध्ये सिंहाला पाहून शेळ्यांची सोबत सोडून देतो तसेच अनादी कर्मसंबंधामुळे 'स्व' स्वरूपाला विसरून कर्मजनित उपाधीला अर्थात शरीर, संपत्ती इत्यादी परवस्तूंना आपले समजतो. जेव्हा सद्गुरूंच्या उपदेशाने त्याला आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होते तेव्हा 'पर' वस्तूरूपी शेळीपासून तो स्वतःला भिन्न समजू लागतो. तो समजून जातो की, "मी चैतन्यस्वरूपी आहे, मी सर्व प्रकारच्या अधिव्याधी आणि उपाधीने रहित आहे. हे शरीर, स्वजन, संपत्ती इत्यादी विपत्तींचे घर आहे. मी निराकार आहे. हे साकार
Eascarlastiiyeantiwandmarimationaindinavincestions