________________
(३८५)
आसक्तीला, आवेशाला जन्म देणाऱ्या ममत्वाला सोडून दे, त्याच्यासाठी 'पर' वस्तू, जीतू स्वतःची मानतोस त्याचा त्याग कर. आणि निराकाक्ष बनून अनुभव सुखाचा आस्वाद घे.
एखादा यांत्रिक रस्त्याने जात असताना त्याला दुसऱ्या यांत्रिकेबरोबर स्नेह नाते जोडण्याची काय आवश्यकता ? सर्व जीव आपापल्या कर्मानुसार कार्यरत होतात म्हणू कोणालाही आपले मानून आसक्तीपूर्ण भाव का ठेवावा ?
ज्यांना तुमच्याबद्दल प्रेम नाही त्यांच्याबरोबर तुम्ही प्रेम वाढविण्याचा प्रयत्न कराल तर अनंत यातना तुम्हाला घेरून टाकतील. हा पौद्गलिक मायाजाळ असाच प्रेमशून्य आहे, त्यात तुम्ही व्यर्थच वेडे होऊन दुःख भोगता. हे तुमचे नाही. ज्याचा शेवटी बियोग निश्चित आहे त्या संयोगाचा त्याग करा. आणि तुम्ही निर्मळ, शुद्ध जिनेश्वरांचे ध्यान करा. आपली तहान शांत करण्यासाठी मृगजळाकडे पळणारी व्यक्ती कधीही तृप्त होऊ शकत नाही. कारण मृगजळामध्ये पाणीच नाही. जी माती चकाकते ती पाण्यासारखी प्रतीत होते म्हणून तेथे तृप्त होण्याची आशा करणे व्यर्थ आहे. म्हणून ग्रंथकार लिहितात जिनेश्वर प्रभूंचे स्मरण करा, ते निराश्रितांसाठी आश्रयरूप आहेत. ते मोक्ष गती प्राप्त करण्यासाठी सुगम उपायरूप आहे. आत्म्याच्या रोगाचा नाश करणारा शांतीरूपी अमृतरस, जो सदैव दोषरहित आहे त्याचे पान करा, 'अन्य'ला 'अन्य' समजा. त्याला आपले कधी १८० मानू नका.
-
ह्या गितीकेमध्ये साधकाला संकेत केला आहे की, हे साधक तू पर घराला सोडून स्व-घरामध्ये दृष्टी टाक. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की बहुधा संसारात हेच पाहिले जाते की जी वस्तू जेथे नाही तेथे ती शोधण्याच्या प्रयत्नात वेळ आणि श्रम दोन्ही खर्च होतात.
कस्तूरी मृगाच्या नाभीमध्येच कस्तूरी असते. मृगाला त्याचा सुगंध येतो परंतु तो हे समजू शकत नाही की सुगंध तर माझ्या नाभीतूनच येत आहे. तो सुगंध शोधण्यासाठी दाही दिशेत भटकतो परंतु त्याला तो सुगंध मिळत नाही. सुगंध स्वतःकडे असतो आणि शोध बाहेर घेत असतो. सर्व मृगांमध्ये कस्तूरी मृग श्रेष्ठ असतो. त्याचप्रमाणे सर्वजीवसृष्टीत मनुष्य प्राणी श्रेष्ठ असतो. परंतु तो 'पर' घरात, 'पर' परिणतीमध्ये 'धर्म' शोधतो. जो 'पर' घरात राहतो, 'पर' घरात धर्म शोधतो त्याला 'मिथ्यादृष्टी' म्हणतात. जो 'स्व' घराला पाहतो, 'स्व' घरात येतो तो सम्यग्दृष्टी आहे. 'आत्मपरिणती' आपले घर