Book Title: Jain Darshan Bhavna Part 01
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 383
________________ (३६९) साथ शोधण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणाचाही सफल झालेला नाही आणि कधी होणारही नाही. ह्या दिशेत केलेले सर्व श्रम व्यर्थ होणारे आहेत चांगल्या पिकाच्या आशेने दगडावर बी पेरण्यासारख्या व्यर्थ श्रमाने काय फायदा ? मनुष्य विचार करतो ह्या संसारातील स्वजन माझ्यासाठी किती कष्ट घेतात. माता पालन-पोषण करते, पिता रक्षण करतात, मित्रजन कार्यात सहयोग देतात त्यात सफलता सुद्धा मिळते. त्याला व्यर्थ कसे समजले जाईल ? कविवर उमेशमुनी महाराजांनी आपल्या हस्तलिखित पदामध्ये ह्याच भावनेला व्यक्त करताना लिहिले आहे - जन्म लिया तब से सामाजिक घिरा रहा लोगों से. कार्य सधे जद मिले, सफलता आपस के योगों से, एक चना फोडे क्या पहाड ? कि यह विश्वास लगे सुखकार आप ही आप निहारो ॥१०॥ बाह्य सहयोगाने कार्यात यश मिळते परंतु ते कर्माधीन आहे. पुष्कळशा लोकांना सहयोग देणारे सुद्धा भेटतात परंतु पूर्वकृत अशुभ कर्मामुळे सफलता मिळत नाही. सहयोग देणारे मात्र निमित्तरूप बनतात. बाकी सफलता आणि असफलता आपल्या कर्मानुसार मिळते. आपण संसारात पाहतो की कित्येक माता मुलांना जन्म देऊन मरून जातात. कित्येकजण आपल्या मात्या-पित्यांची सेवा-शुश्रुषा करीत नाहीत. संयोग आहे. परंतु सहयोग नाही अशी परिस्थिती असली तरीसुद्धा खेद करू नये. कारण हे तर आपणच बांधलेल्या कर्माचे फळ असते. सहयोग यश प्राप्त करवून देतो हा केवळ भ्रम आहे. असे जरी हृदयात दृढ केले तर भ्रमामुळे भ्रमण होणार नाही. यह संसार महासागर है, हम मानव है तिनके । इधर उधर से बहकर आए, कौन यहाँ पर किनके ।। इथे सर्व एकटेच आहेत, कोणी कोणाचा नाही. परंतु एक दुसऱ्याला स्वार्थाने माझे म्हटले जाते. 'सप्तरत्नम्' च्या एका प्रसिद्ध श्लोकात म्हटले आहे - ज्याची फळे कमी अथवा

Loading...

Page Navigation
1 ... 381 382 383 384 385 386 387 388 389 390 391 392 393 394 395 396 397 398 399 400 401 402 403 404 405 406 407 408