________________
(३६७)
एकत्वच सत्य, सुंदर आणि कल्याणकारी आहे. सुख, शांती आणि स्वाधीनता एकत्वाच्या आश्रयानेच प्रकट होते. कारण त्यांचा निवास एकत्वातच आहे. एकत्वभावनेचे सार तर एकत्वाला ओळखण्यात आहे. आणि एकत्वाची आराधनाच आराधनेचा सार
आहे.
अनित्य, अशरण आणि संसार भावनेच्या चिंतनात संयोगाला क्षणभंगुर अशरण, निरर्थक आणि 'स्व' स्वभावाची नित्यता, शरणभूतता आणि सार्थकता अत्यंत स्पष्ट झाल्यावरही ज्ञानी-अज्ञानी सर्वांना आपल्या आपल्या भूमिकेनुसार सुख-दुःख मिळून-जुळून भोगण्याचा विकल्प थोडाफार राहतोच. मूळापासून नष्ट होत नाही.
उपरोक्त विकल्पाला मूळापासून उखडून फेकण्यासाठीच एकत्वभावना आणि अन्यत्वभावनेचे चिंतन केले जाते.
गणेशमुनी शास्त्रींनी समग्रतेने एकत्वभावनेचा हृदयस्पर्शी विस्तार केला आहे. त्यांचे एक एक पद आत्म्याला उर्ध्वगमन करविण्यासाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे -
अनेकत्व के साथ छेडिये, क्यो न आंतरिक अपना युद्ध ।
मुनि गणेशशास्त्री लिखते है, यह एकत्व भावना शुद्ध ।।
जगाबरोबर जे अनेकत्व स्थापित केले आहे त्यांच्याबरोबर आंतरिक युद्ध करून एकत्वावर विजय प्राप्त करण्याचा संकेत केला आहे.
पुद्गल पर से प्रेम हटाओ, जोडो आत्मा से संबंध ।
फुटेगी एकत्व तत्त्व की, कस्तुरी सम वन में गंध ॥१५२ ज्याचे पर वस्तूवरून प्रेम कमी होईल तोच आत्म्याबरोबर संबंध जोडू शकेल आणि ज्याचा संबंध आत्म्याबरोबर जुळेल त्याच्या अंतःकरणातून एकत्व तत्त्वाचा सुगंध कस्तूरीप्रमाणे संपूर्ण जीवनरूपी उपवनाला सौरभान्वितकरून टाकेल. पर पुद्गलाचा सर्वथा संबंध तुटल्यानंतर अवश्य आत्मसौंदर्य प्राप्त होईल.
'एकत्व' केवळ आत्म्याचे सौंदर्य नाही परंतु व्यावहारीक जीवनाचे सुद्धा सौंदर्य आहे. 'पर' बरोबर संबंधांची चर्चा करणे 'असत्' आहे, विसंवाद उत्पन्न करणारी आहे. एकत्वाने वस्तंच्या अखंडतेचे ज्ञान होते. कणाकणांच्या स्वतंत्र सत्तेचे उद्घाटन करण्यासाठी एकत्वाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.
एकत्वाच्या ज्ञानाने स्वाधीनतेचा स्वाभिमान जागृत होतो. स्वावलंबनाची भावना