________________
(३६५)
उपाधी सुद्धा ह्या द्वन्द्वामध्येच उत्पन्न होतात. परंतु जन्मापासून जीव त्याच्याबरोबर कोणती उपाधी घेऊन येतो आणि मरताना काय बरोबर घेऊन जाईल ह्यावर चिंतन करण्यासाठी श्री तिलोक ऋषी महाराजांनी आपल्या बारा भावनेच्या 'सज्झाय'मध्ये खूप सुंदर रचना करून लिहिले आहे.
"जन्म लिओ जब कोई न साथी, मरता पण न हि लारे । बंधी मुठीये जन्मज लीनो, जावे हाथ पसारी रे प्राणी जग माया सब काची, थे किमकर मानी छे साची रे प्राणी धन कुटुंब, रिद्धि संपत पाइ, सो निज पुण्य प्रभावे ।
जिम समे पुण्य को छेडोज आवे, देखत में विरलावे रे प्राणी ।।१४७
मुट्ठी बांधून येणारा, हात पसरवून निघून जातो. जोपर्यंत पुण्याचा जोर राहतो . तोपर्यंत सर्व सुख, सुविधा, स्वजन साथ देतात. पुण्य समाप्त होताच क्षणात सर्व काही नष्ट होते.
प्रत्येक जीव आपापल्या कर्माच्या फळाला एकटाच भोगतो. अशा परिस्थितीत कोण कोणाचा स्वजन आणि कोण कोणाचा परिजन आहे.१४८ ह्या गोष्टीचा सतत विचार केला पाहिजे.
घिरे रहो परिवार से, पर भूलो न विवेक ।
रहा कभी मै एक था अन्त एक का एक ।
पापो का फल एकले, भोगा कितनी बार ?
कौन सहायक था हुआ, करले जरा विचार ।१४९ संसारामध्ये राहता राहता सुद्धा कमलाप्रमाणे राहीले तरच आत्मसुख प्राप्त होईल.
परंतु मोह आणि मायेमध्ये गुरफटलेली व्यक्ती समजते की दुसरे जरी मरत असले तरी त्याचे मला काय ? मी कोठे मरणार आहे ? कदाचित मृत्यू स्वतःला सुद्धा येणार आहे हे समजत असले तरी स्वतःच्या मेहनतीने प्राप्त केलेली संपत्ती मृत्यूच्या वेळी बरोबर येईल असे मानून लोक पाप कर्मे करीतच असतात.
हे आश्चर्य करण्यासारखे आहे की कधी कोणाचा अचानक मृत्यू होतो. आणि पाहणारा समजतो की माझी सुद्धा अशीच स्थिती होईल तरी सुद्धा तो दुःखरूप ममतेला सोडू शकत नाही.