Book Title: Jain Darshan Bhavna Part 01
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 390
________________ (३७६) होते, आई मुलाला विकून टाकते, पुत्र पित्याला मारून टाकतो, पत्नी पतीला मारून टाकते. अशी अनेक उदाहरणे आगम ग्रंथात आहेत. तसेच रोजचे वर्तमानपत्र वाचताना अशी अनेक उदाहरणे दिसतात. या अशा वार्ता ऐकून आणि वाचून हृदय प्रकंपित होते. 'राजप्रश्निय' सूत्रात एक प्रसंग आहे - प्रदेशी नावाचा राजा नास्तिक होता. आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक, पुण्य-पाप इत्यादींमध्ये तो विश्वास करीत नव्हता. केशीकुमार श्रमणाच्या उपदेशाने त्याने सद्बोध प्राप्त केला, तो सम्यक्त्वि झाला आणि धर्माचरणाच्या दिशेत प्रवृत्त झाला. उत्तरोत्तर त्या दिशेत गतिशील होत राहिला. धन, संपत्ती, सैन्य, निधान, नगर, अंत:पुर इत्यादींबद्दल त्याच्या मनात औदासिन्यता वाढू लागली कारण राजाने जीवनाच्या यथार्थ लक्षाला समजून घेतले होते. त्यांना 'स्व-पर'चे भेदज्ञान झाले होते. ___ परंतु ज्याच्या भावनेत अशुभचिंतन अथवा पापपूर्ण चिंतन भरलेले असते अशी व्यक्ती आपल्या हीन वृत्तीमुळे दुसऱ्यांच्या पवित्र कार्याने सुद्धा दुःखी होतात. प्रदेशी राजाची राणी सुरीकंता आपल्या पतीची धर्मोन्मुखता पाहून अत्यंत दु:खी झाली. ती विचार करू लागली जेव्हापासून राजा धर्माराधनेमध्ये संलग्न झाला आहे तेव्हापासून तो सांसारिक भोगांपासून, माझ्यापासून विन्मुख झाला आहे. अशा पती पासून मला काय लाभ ? असा विचार करून राणीने राजाची हत्या करण्याचा विचार केला. तिने पुत्र-राजकुमार सूर्यकांतला आपल्या समर्थनात घेण्यासाठी आपले विचार त्याच्यासमोर ठेवले आणि सांगितले, तुला राज्य सांभाळायचे आहे. राज्यसुखाचा उपभोग घ्यावयाचा आहे. राजकुमाराने आपल्या आईच्या वाईट विचारांना अनुमोदन दिले नाही परंतु तो तिथून निघून गेला. सूरिकांताच्या मनात शंका आली की राजकुमाराने राजाला माझे विचार सांगितले तर काय होईल ? म्हणून तिने शीघ्रातिशीघ्र राजाचे जीवन नष्ट करण्याचा विचार केला. तिने राजाच्या आहारात, वस्त्रात हुंगण्यास योग्य अशा पदार्थात विष मिळविले. नंतर राजा जसे जेवण करण्यासाठी बसला तसे विषमिश्रित जेवणाने राजाच्या शरीराची अत्यंत आग होऊ लागली. राजाला राणीच्या षड्यंत्राची कल्पना समजली. हे समजून देखील त्यांनी विशुद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यामुळे त्यांच्या मनात थोडी सुद्धा दुर्भावना उत्पन्न झाली नाही. राजा औषधशाळेत निघून गेले आणि विधिपूर्वक संथाराव्रत त्यांनी ग्रहण केले आणि आत्मभावनेमध्ये लीन झाले. येथे अशुभ भावनेचा आणि शुभ भावनेचा स्पष्ट आभास होतो. किती स्वार्थांधता ? आपल्या भोगमय जीवनात अडथळा समजून राणीच्या मनात जे कलुषित मा

Loading...

Page Navigation
1 ... 388 389 390 391 392 393 394 395 396 397 398 399 400 401 402 403 404 405 406 407 408