Book Title: Jain Darshan Bhavna Part 01
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 391
________________ (३७७) विचार उत्पन्न झाले ते अत्यंत अधम होते. त्यावेळी जर राजाचा आत्मा धर्ममय नसता तर ते राणीला दंडसुद्धा देऊ शकले असते किंवा वाईट विचारांनी आपली गती दुर्गतीसुद्धा केली असती. परंतु ज्यांनी आत्मा आणि आत्मेतर जे काही व्यक्ती अथवा वस्तू आहे त्याला 'अन्य' मानले, त्यांचा अशा भयंकर परिस्थितीतही समभाव टिकून राहतो. तो असे विचार करतो की भोगात्मक जीवनाचा हा दुष्परिणाम आहे. ज्याला राणीने विषप्रयोगाद्वारे क्रियान्वित केले. ___ इतके झाल्यानंतरसुद्धा राजाच्या मनात जो शुभ भावनेचा उगम झाला. तो हेच सिद्ध करतो की जी व्यक्ती शुभ भावनेने युक्त असते ती कधीही वाईटाचा बदला घेत नाही. राजाला सर्व काही कळले असूनही ते आत्मस्थ राहिले. ह्याला कर्म संयोग मानून पुढील आयुष्याला आणखीन निर्मळ, शुद्ध बनविण्याचा प्रयत्न केला. हा त्यांच्या शुभ भावनेचा परिणाम होता. भावनेच्या तात्पर्याला त्यांनी आत्मसात केले होते. मी आणि माझे शरीर दोन्ही अन्य आहे, पत्नी, पुत्र, परिवार माझ्याहून अन्य आहेत, वेगळे आहेत असे विचार मनुष्याला पतनापासून वाचवितात. याचा परिणाम म्हणजे आत्मकल्याण होते. ह्या उदाहरणाने जगातील विचित्रतेचे ज्ञान होते. ज्यांच्यासाठी मनुष्य आपला अमूल्य वेळ, पैसा आणि शरीराचा भोग देतो तीच माणसे स्वतःचा स्वार्थ सिद्ध होत नाही असे म्हटल्यावर कसे कुकर्म करतात, कसे अपकारी होतात हे ह्या प्रदेशीराजाच्या उदाहरणावरून समजण्यासारखे आहे. राजा प्रदेशी तर जीवन असेपर्यंत अन्नजलाचा त्याग करून, आत्मालोचना करून, प्रतिक्रमण करून समाधीपूर्वक आयुष्य पूर्ण होताच शरीराचा त्याग करून सौधर्मकल्पाच्या सूर्याभविमानाच्या उपपात सभेमध्ये सूर्याभदेवाच्या रूपात उत्पन्न झाले.१६३ अन्यत्वभावनेमध्ये हेच चिंतन करायचे आहे की, हे जीवात्मा, जर एक पत्नीसुद्धा पतीबरोबर असे दुष्कर्म करू शकते तर दुसरे कोण माझे होणार ? जे माझे आहे ते माझ्यातच आहे. 'पर' मध्ये अशांती आहे. 'स्व'मध्ये शांती आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्याबरोबर ज्यांचा संबंध असतो ते अत्यंत शोकाकूल होतात. परंतु स्वतः संसारसागरात बुडत चालले आहेत याविषयी शोक करीत नाहीत. 'पर'ची पंचाईत करण्यात ते 'स्व'ला विसरतात. म्हणून आपल्या आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शरीर स्वजनादी बाह्य पदार्थांना वेगळे समजावे आणि मी ज्ञानदर्शनरूप आत्मा आहे असे चिंतन करावे.१६४

Loading...

Page Navigation
1 ... 389 390 391 392 393 394 395 396 397 398 399 400 401 402 403 404 405 406 407 408