________________
(३७८)
आचार्य उमास्वाती यांनी तत्त्वार्थ भाष्यामध्ये अन्यत्वभावनेचे वर्णन करताना लिहिले आहे - शरीर इंद्रियगोचर, मूर्त आहे आणि मी अतिन्द्रिय, अमूर्त आहे. शरीर अनित्य आहे. आयुष्य पूर्ण होताच शरीर नष्ट होते अथवा त्यापूर्वीसुद्धा अनेक प्रकारे जीर्णशीर्ण होत राहते. परंतु मी नित्य आहे. कधीही नष्ट अथवा जीर्णशीर्ण होत नाही. शरीर अज्ञज्ञानशून्य आहे आणि मी ज्ञानदर्शनरूप आहे. शरीर आदी अंतसहित असते कारण ते उत्पन्न होते आणि नष्टही होते. परंतु 'मी' ह्या दोन्ही धर्मांपासूनरहित आहे. मी अनादी अनंत आहे. जो जीव अशाप्रकारे सतत चिंतन करतो त्याला शरीराविषयीं ममत्त्वभाव राहत नाही. १६५ तो विचार करतो की,
"संसारात परिभ्रमण करता करता ह्या जीवाची लाखो शरीरे भूतकाळात गेलीत. त्याहून भिन्न असा माझा आत्मा आहे. जर शरीराहून मी वेगळा आहे तर बाह्य पदार्थापासून भिन्न असलो तर त्यात आश्चर्य काय ?१६६
जे आपल्याला आत्महितामध्ये लावतात आणि अहित करू देत नाहीत असे साधुगण ह्या आत्म्याचे मित्र आहेत, बंधू आहेत. ते इंद्रियजन्य आणि अतिंद्रिय सुखाचे कारण आहेत आणि अनेक दुःखाने भरलेल्या संसारातून पार करतात. भगवती आराधनेमध्ये लिहिले आहे की, साधुगणांचा मित्र रूपात व बंधुगणांचा शत्रूरूपाने चिंतन करणे म्हणजेच अन्यत्वभावना होय. १६७
येथे 'शत्रू' याचा अर्थ कोणाबरोबर 'शत्रूत्व करणे' असा नाही परंतु जे धर्ममार्गाकडे प्रवृत्त करतात, धर्माचा उपदेश देतात त्यांचा आदर-सत्कार करावा, आणि सर्व इष्ट सुखाला देणाऱ्या धर्मात विघ्न आणणाऱ्या बंधुजनांना, पदार्थांना अर्थात जे आत्म्याहून भिन्न आहेत, अन्य आहेत, जे चार गतीरूप घटीयंत्रांवर चढविणारे आहेत त्यांचा अनादर करावा. त्यांच्याबरोबर संबंध ठेवू नयेत. 'अनादर' याचा अर्थ 'अप 'करणे' असा नसून माझे हितचिंतक नाहीत, हे मला बंधनात टाकणारे आहेत, मुक्त करणारे नाहीत असे चिंतन करणे.
ज्याप्रमाणे अनेक देशांहून आलेले प्रवासी रात्री विश्रांतीसाठी धर्मशाळेत एकत्रित होतात अथवा एखाद्या झाडावर अनेकपक्षी विश्राम करण्यासाठी येऊन राहतात आणि सूर्योदय होताच सर्वजण आपल्या आपल्या मार्गाने निघून जातात त्याचप्रमाणे स्त्री, पुत्र, मित्र इत्यादी अनेक गतीने पाप-पुण्य घेऊन कुळरूपी धर्मशाळेत येतात आणि आयुष्य पूर्ण झाल्यावर सर्वजण आपल्या आपल्या पाप-पुण्यानुसार नरक, तिर्यंच, मनुष्य इत्यादी