________________
E
सुवर्ण आपले स्वरूप गमावते. तसेच पुद्गल भावामध्ये आत्म्याने आपली विशुद्धता गमावून टाकली आहे. आत्मा तर अरूपी आहे परंतु पुद्गलाच्या संगाने आत्मा जोपर्यंत कर्मबंधनात असेल तोपर्यंत विविध रूपे धारण करेल.
कर्मामुळे आत्मा देव, नरक, तिर्यंच-जनावरे आणि मनुष्याची रूपे धारण करतो. हे जड पुद्गल चैतन्य आत्म्याला वेगवेगळे नाच नाचवते.
म्हणून निरंतर चिंतन करायचे की, मी ह्या सर्व बाह्य रूपांपासून 'पर' आहे. हे सर्व रूप कर्मजन्य आहे.
तसेच पुण्य आणि पापाला सुद्धा सारखे समजावे. पुण्याचा किंवा पापाचा द्वेष करू नये.
पुण्य आणि पाप दोन्ही कर्म पुद्गल आहे. त्याने आत्म्याच्या अलिप्ततेचा भाव दृढ करायचा आहे. आध्यात्मिक चिंतनात पुण्याचे किंवा पापाचे महत्त्व नाही. आत्मभाव दोन्हींपासून मुक्त आहे. ह्याचा अभिप्राय हा आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत खानपान राहणी, करणी इत्यादी कार्यात अशुभ कर्म पुद्गलांचा बंध तर होतोच तरी पण जगण्यासाठी सर्व काही करावे लागते. तसेच अन्य जीवांना सुद्धा आपल्या आत्म्याप्रमाणे समजून दया, दान इत्यादी शुभ कार्यरूपी पवित्र धर्मक्रिया तर करायची आहे. परंतु त्याच्यातही ममत्व ठेवायचे नाही. त्यामुळे नवीन कर्मबंध होत नाहीत.
इंद्रिये, शब्द, रस, रूप, गंध, स्पर्श इत्यादी विषयांना जाणतात. आत्म्याचा 'शब्द' इत्यादी विषयांबरोबर काहीच संबंध नाही. आत्म्याचे विषय तर केवळ ज्ञानोपयोगी, दर्शनापयोगी आहे. त्याचा अभ्यास जीवनाच्या अंतापर्यंत करायचा आहे. इंद्रिये नेहमी आपल्या विषयांपासून विन्मुख राहू शकत नाहीत. परंतु त्यांना अशुभापासून शुभ दिशेमध्ये जोडले जाऊ शकते. इंद्रियांबोबर चैतन्य आणि मनाला न जोडणे हे महत्त्वाचे आहे.
ज्याप्रमाणे शहरामध्ये शुद्ध पाण्याची पाईपलाईन आणि घाण पाण्याची पाईपलाईन बरोबरच असते. त्यामुळे जर कधी पाईपलाईन फुटली तर शुद्ध जल आणि मल यांचे मिश्रण होते. ही गडबड जनस्वास्थ्यासाठी धोकादायी ठरते. याचप्रमाणे आपल्या
आंतरमनातील जल आणि मळ यांच्या नाल्यांना वेगवेगळे वाहू द्या. इंद्रियांना आपले कर्म करू द्या, चेतनेला ज्ञान, दर्शन यांच्या आत्मविषयात रमू द्या.
जर चेतना इंद्रियांबरोबर जोडली नाही तर इंद्रिये विषयांना ग्रहण करणार नाही. ह्याला 'अनध्यवसाय' असे म्हणतात. उदाहरणार्थ - एका व्यक्तीला हीरा खरेदी करायचा