________________
(३६२)
राहिले होते. कधी ते लक्ष्मणाच्या मृतदेहाला स्नान करवीत होते, कधी चंदनाचा लेप करायचे, शय्येवर झोपवून त्याच्यावर पंखा ढाळायचे. अशाप्रकारे राग भावनेने उन्मत्त होऊन विविध चेष्टा करीत होते.
सीताजींचे रक्षण करता करता मेलेला जटायूपक्षी मृत्यूनंतर माहेन्द्र देवलोकात 'देव' झाले होते. ते श्रीरामाचे ममत्व तोडण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्या देवाला श्रीरामाच्या प्रती दृढ स्नेह होता. त्या स्नेहाने प्रेरित होऊन तो श्रीरामांजवळ येतो आणि रामाची मोहमूढ दशा पाहून त्यांना प्रतिबुद्ध करण्यासाठी विविध उपाय करतो.
श्री रामांचा सेनापती कृतान्तवदनसुद्धा मरून देव झाला होता. तो सुद्धा श्रीरामाला प्रतिबोध देण्यासाठी तिथे अयोध्येमध्ये येतो. दोन्ही देवांनी विविध प्रयोगाद्वारे श्री रामाची मूर्छाभावना दूर केली. लक्ष्मणाचा मृत्यू झाला आहे ही वास्तविकता समजली तेव्हा श्री रामाने लक्ष्मणाच्या मृत्यूची घटना मान्य केली. दोन्ही देव श्रीरामाला नमस्कार करून देवलोकात निघून गेले.
श्रीरामाने लक्ष्मणाच्या मृतदेहाचा अग्निसंस्कार केला. श्रीराम आता संसारातून विरक्त झाले. लव, कुशानीसुद्धा दीक्षा घेतलेली होती. लक्ष्मणाचा मृत्यू आणि सर्वांच्या विरहाने श्रीरामांसाठी जग उजाड झाल्यासारखे वाटत होते. संसाराच्या वास्तविकतेचे त्यांना ज्ञान झाले होते. त्यांनी शत्रुघ्नाला राज्य ग्रहण करण्यास सांगितले. परंतु शत्रुघ्नाने सांगितले की, मी सुद्धा तुमच्याबरोबरच दीक्षा घेईन. तेव्हा रामाने 'लव'चा पुत्र अनंगदेव याचा राज्याभिषेक केला आणि स्वतः सुव्रत नावाच्या महामुनींजवळ अणगार झाले. ही बातमी संपूर्ण भारतात पसरली आणि सोळा हजार राजांनी सुद्धा दीक्षा घेतली. एकत्व आणि समत्वाची साधना-आराधना करता करता श्रीरामांनी मुक्ती मिळविली.
___ ज्यांना सर्व कर्मांपासून मुक्ती प्राप्त करायची आहे त्यांनी एकत्व आणि समत्वाची साधना केलीच पाहिजे. अरे ! ज्यांना इहलौकिक जीवनातही शारीरिक, मानसिक संतापातून क्लेशातून मुक्ती प्राप्त करायची आहे त्याला सुद्धा एकत्व आणि समत्वाची साधना करावी लागते.
मनुष्याला प्रश्न पडतो की आत्म्याचे विशुद्ध रूप कोठे लपलेले आहे ? वरील उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की जोपर्यंत ममत्व आहे तोपर्यंत विशुद्ध रूप प्रकट होत नाही. ममत्वभाव, परभाव अथवा पुद्गल भावामध्ये विशुद्ध आत्म्याचे स्वरूप हरवले आहे. आणि म्हणूनच ग्रंथकाराने सुवर्णाचे उदाहरण दिले आहे. पितळ अथवा अन्य धांतूमध्ये