________________
(२९०)
नाही त्याचप्रमाणे आत्मेतर पदार्थांमध्ये अनित्यतेचे चिंतन केल्याने त्याच्या
दियोगाने काही दुःख होत नाही.१७
जे काही उत्पन्न होते त्याचा निश्चितपणे नाश होतो, परिणामी काहीच नित्य ११८ कोणतीही वस्तू द्रव्यत्व आणि गुणत्वाच्या अपेक्षेने नित्य म्हणून शकतो आणि याच्या दृष्टीने अनित्य असते. अत्यंतिक आणि एकांतिक दृष्टीने कोणतीही वस्तू नित्य किंवा नित्य नाही. जैन सिद्धांतानुसार प्रत्येक द्रव्य, गुण आणि पर्याय युक्त आहे.१९ त्यांचा एक समुदाय आहे. गुण आणि पर्यायाच्या समुदायाशिवाय द्रव्य नावाची कोणतीही वेगळी वस्तू नाही. इथे एक लक्षात घेण्यासारखे आहे की गुण आणि पर्याय काही वेगवेगळ्या वस्तू नाहीत. त्यांची स्वतंत्र सत्ता नसते. वस्तू एक अखंड समवाय आहे. त्याचे तुकडे करता येत नाही. त्यात जे भेद दिसून येतात ते बुद्धीभेदामुळे निर्माण झालेले आहेत.
येथे सांसारिक पदार्थांची अनिश्चितता दाखविण्यासाठी वस्तूच्या उत्पाद, व्ययाची चर्चा केलेली आहे. ती आपल्या प्रस्तुत विषयाशी संबंधित आहे.
जन्माबरोबरच यौवन, वार्धक्य आणि मृत्यूशी संयुक्त आहे. धन, वैभव इत्यादी सर्व पदार्थ नश्वर आहेत, अध्रुव आहेत. ज्या शरीराला सुशोभित, अलंकृत, परिपुष्ट करण्याचा मनुष्य नेहमी प्रयत्न करतो तेच शरीर त्याला एक दिवस सोडून निघून जाते. म्हणून 'भवि जिज्ञासू'ने सांसारिक विषयांमधील ममत्वाचा त्याग केला पाहिजे. कारण हे विषय विनाश करणारे आहेत. आपल्या मनातून भोग-वासना दूर करावी. जोपर्यंत भोगलिप्सा मनातून जाणार नाही तोपर्यंत मोहजालाचा नाश होणार नाही. अशाप्रकारे विषयाच्या वास्तविक स्वरूपाला समजून, त्याला सर्वथा अनित्य मानून त्यापासून स्वतःला दूर ठेवावे.२०
स्त्री इत्यादी चैतन्यद्रव्य, सुवर्ण इत्यादी, अचैतन्य द्रव्य आणि चैतन्य-अचैतन्य इत्यादी मिश्र पदार्थ हे सर्व काही नश्वर आहे अशाप्रकारे चिंतन केले पाहिजे. जो पुरुष अशा भावना ठेवतो तो त्या पदार्थाचा अभाव झाला तरीही त्यात कोणत्याही प्रकारे ममत्व अथवा आसक्ती ठेवत नाही. जसे उच्छिष्ट भोजनाची कोणीच इच्छा करीत नाही तसेच त्या पदार्थाच्या ममत्वाचा अभाव झाल्याने अविनाशी स्वतःच्या आत्म्यालाच भेद, अभेदरूप रत्नत्रयाच्या भावनेने युक्त करतो आणि ज्याप्रमाणे अविनाशी आत्म्याची भावना करतो त्याप्रमाणे अक्षय, अनंत सुखस्वरूप स्वभावाचा धारक असणाऱ्या मुक्त आत्म्याला प्राप्त होतो."