________________
अनित्य भावनेच्या चिंतनाचे प्रयोजन भ्रमाला खंडीत करणे आहे. मनुष्य जितका मांत राहतो तितकाच अधिक दुःखी होतो. हे सत्य जाणून अनित्य भावनेच्या अभ्यासाद्वारे प्रमाला तोडले पाहिजे. मनुष्याची ही सवयच असते की तो प्रथम खोट्या मान्यतेची इमारत उभी करतो आणि ती तुटल्यावर दुःखी होतो. भ्रमाच्या समर्थनासाठी व्यक्ती तर्क करीत राहते. यामुळेच वादविवाद होतात. अनेक भ्रम पसरतात आणि व्यक्ती सत्यापर्यंत पोहच शकत नाही. म्हणून मान्यतेच्या मायाजालाला आवरून सत्याचे दर्शन करण्यासाठी भावनेचे सतत चिंतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ममत्वाची भावना नष्ट होईल. मनुष्य वस्तू अथवा व्यक्तीचा वियोग झाल्याने दुःखी होत नाही. तर त्याने ज्यांना आपले मानले होते त्यांच्या वियोगामुळे त्याचा त्यांच्याबद्दलचा माझेपणाचा भ्रांत भाव, भ्रम तुटल्याने अधिक दुःखी होतो. या अनित्यतेला समजून जे नित्य आहे त्याची आराधना करणे हेच भावनेचे सार आहे.
संयोग क्षण भंगुर सभी पर आतमा ध्रुव धाम है, पर्याय लय धर्मा परन्तु द्रव्य शाश्वत धाम है । इस सत्य को पहचाननाही भावना का सार है,
ध्रुव धाम की आरधना, आराधना का सार है ॥४६ अनित्य भावनेची प्रेरणा - अनित्य भावना साधकाला ही शिकवण देत नाही की तुम्ही कुटुंब, समाज राष्ट्र इत्यादींपासून वेगळे राहा, सर्वकाही सोडून एकांत गुफेमध्ये निघून जा किंवा जबाबदारीला घाबरून पलायन करणे म्हणजे साधना नव्हे. आपली जबाबदारी सांभाळणे हे तर व्यक्तीचे मुख्य कर्तव्य आहे. अनित्य भावना साधकाला अशी । प्रेरणा देते की वर्तमानामध्ये जे पदार्थ ज्या रूपामध्ये प्राप्त आहेत ते नेहमी त्याच रूपात राहणार नाहीत. ते प्रतिक्षण बदलत राहतात. ते आज आहेत तर उद्या नाहीत म्हणून त्यामध्ये ममत्वभाव अथवा आसक्ती ठेवू नये.
अनित्य भावना साधकाच्या मनामध्ये आणि जीवनामध्ये आध्यात्मिक चेतना जागृत करते. इष्ट वियोग आणि अनिष्ट संयोगामध्ये मनात दुःख, वेदना आणि आर्तध्यान होऊ नये, प्रतिक्षण समभाव राहावा म्हणून ही भावना सतत साधकाच्या मनात स्थिर राहायला पाहिजे.
संसारामध्ये पूर्व योनीला सोडून मानव योनीमध्ये जन्म ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम अनित्यताच आपल्या मांडीवर घेते. आणि त्यानंतर माता आणि पृथ्वी कारण