________________
(३२७)
PROPORT
ग केले आणि एका आवली काळानंतर दुसऱ्या काळामध्ये त्याला भोगून सोडून दिले अथवा निर्जरीत केले. त्यानंतर अनंत वेळा गृहीत-अगृहीत आणि मिश्र पुद्गलांना ग्रहण करता करता जेव्हा तेच पुद्गल त्याच जीवाला त्याचप्रमाणे कर्मरूपाने येतात त्या सर्वांना कर्म द्रव्यपरिवर्तन म्हणतात.
पुद्गल परावर्तन - ज्याप्रमाणे रंगभूमीमध्ये प्रविष्ट झालेला नट अनेक रूप धारण करतो त्याचप्रमाणे द्रव्य संसारामध्ये भ्रमण करताना जीव निरंतर अनेक आकार रूप, स्वभाव इत्यादी ग्रहण करतो आणि सोडतो. हा द्रव्य संसार आहे. ह्याला आचार्य कुंदकुंद 'पुद्गल परावर्तन' म्हणतात.
क्षेत्र परिवर्तन - जगात असा कोणताही प्रदेश नाही जेथे ह्या जीवाने भूतकाळात अनंतवेळा जन्म-मृत्यूचा अनुभव घेतला नसेल. अनेक अवगाहनांबरोबर ह्या जीवाने क्षेत्र संसारात परिभ्रमण केले आहे.
काल परिवर्तन - हा जीव भूतकाळात उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी काळात अनंत वेळा उत्पन्न झाला आणि अनंत वेळा मृत्यू पावला. हे काल परिवर्तन आहे.
भव परिवर्तन - ह्या जीवाने मिथ्यात्वामुळे नरकाच्या आयुष्यापासून उर्ध्वगती, नऊ ग्रेवेयक विमानापर्यंतच्या आयुष्यामध्ये क्रमाने अनेक वेळा भ्रमण केले आहे. हा भव परिवर्तन संसार आहे. 'भव' शब्दामध्ये 'योनी'चा समावेश होत नाही. जीवाच्या पर्यायाला 'भव' म्हणतात. असे भव परिवर्तन ह्या जीवाने अनंत वेळा केले आहे.
का भाव परिवर्तन - लोकाकाशाच्या प्रदेशांना असंख्याताने गुणल्यावर जितकी राशी होते तितकीच ह्या जीवाची अध्यवसाय स्थाने होतात. ह्या असंख्यात लोकप्रमाण अध्यवसाय अर्थात भावामध्ये जीवाच्या परिवर्तनाला 'भाव संसार' म्हणतात. जसे सरडा नेहमी विविध प्रकारचे रंग बदलतो तसेच हा जीव अध्यवसाय बदलता बदलता परिणमन करतो.८७
E RSNEHATIRVASURE
इथे 'अध्यवसाय' शब्द 'भाव' अर्थाने घेतला आहे. अशाप्रकारे द्रव्य, क्षेत्र, काळ, भाव आणि भव रूप संसारामध्ये अज्ञानी जीव पापरूपी मळकट पाण्याने भरलेल्या आणि अत्यंत दुःखरूपी भवऱ्यांनी युक्त अशा संसाररूपी नदीमध्ये चिरकालपर्यंत भ्रमण करतो. है संसाररूपी चक्र विषय, कषायरूपी आऱ्यांनी जखडलेले आहे. कुयोनीरूपी परिधी त्यावर चढलेली आहे. त्यात सुख, दुःखरूपी मजबूत खिळे लावलेले आहेत. अज्ञानरूपी तुंबावर स्थिर आहे. कषायरूपी फलकावर बांधलेले आहे. अनेक हजारो जन्मरूपी विशाल मार्गावर