________________
(३३८)
अरे चेतन आत्म्या ! तू आपल्या ज्ञानरूपी नेत्रांना उघडून बघ. __"निवृत्ति शिघ्रमेव धारी ते प्रवृत्ति बाळ तुं"
आणि शीघ्र निवृत्ती म्हणजे महावैराग्याला धारण कर. आणि मिथ्या कामभोगाच्या प्रवृत्तीला लवकर जाळून टाक.१०३
मिथ्या कामभोगाने कोणते बंध होतात ? संसारी जीव कोठे परिभ्रमण करतात संसारातून मुक्ती कशी मिळू शकते ? ह्यावर विचार केल्याने हा निष्कर्ष निघतो की हे सर्व विश्व, संसारी आत्मा आणि मुक्त आत्मा या रूपाने दोन भागात विभाजित झालेला आहे. जे जीव विविध योनीमध्ये परिभ्रमण करतात ते संसारी आत्मे आहेत. ते चार गती, चोवीस दंडक, चौऱ्यांशी लाख जीवयोनीमध्ये अज्ञानामुळे संसरण करतात.
ह्या संसरणामध्ये कोणत्याही प्रकारे आनंद नाही तरी सुद्धा जीव त्याच्यातच रममाण होतो. त्याला ते अत्यंत प्रिय वाटते कारण तो मोक्ष सुखाच्या गौरवाला जाणत नाही. भटकण्यातच तो आनंद मानतो. ज्या योनीमध्ये, जन्मामध्ये अथवा जीवनामध्ये ज्या अनुकूल सुविधा आणि भौतिक सुख प्राप्त होते त्यातच तो रमून जातो. तो असा विचार करत नाही की कालांतराने हे सर्व काही सुटणार आहे. संसार भावनेमध्ये अशाप्रकारच्या विविधतेचे आचार्यांनी दिग्दर्शन करविले आहे.
आगमाच्या तृतीय अंग-स्थानांग सूत्रामध्येसुद्धा चार प्रकारच्या संसाराचा उल्लेख येतो.
द्रव्य संसार - जीव आणि पुद्गलांचे परिभ्रमण क्षेत्र संसार - जीव आणि पुद्गलांच्या परिभ्रमणाचे क्षेत्र काल संसार - उत्सर्पिणी इ. काळात होणारे जीव आणि पुद्गलाचे परिभ्रमण
भाव संसार - औदयिक इ. भावांमध्ये जीवाचे आणि वर्ण, गंध, रस, स्पर्श इत्यादींमध्ये पुद्गलाचे परिवर्तन.१०४
आणखीन चार प्रकारचा संसार सांगितला आहे - १) नैरयिक २) तिर्यग्योनिक ३) मनुष्यसंसार ४) देवसंसार