________________
भविष्याची करतात. त्या एकदम निरर्थक असतात. पुष्कळशा चिंतेचे समाधान होऊ शकते. परंतु चित्ताला स्थिर केले तर सर्व काही होऊ शकेल. चिंता चितेसारख्या असतात.
___ "बिंदुमात्र प्रभेदेन चिता चिंता समिकृता"
चिता आणि चिंता यांच्यामध्ये एका बिंदूचे केवळ अंतर आहे. चिता तर मृत व्यक्तीला जाळते परंतु चिंता जीवंत प्राण्याला जाळून टाकते. लोकांची रात्रीची झोप उडून जाते, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. जेव्हा मनुष्याच्या इच्छा वाढतात तेव्हा चिंता वाढते आणि चिंता करत करत एक दिवस चितेत जाण्याची वेळ येते तेव्हा सर्वकाही शून्य झालेले असते.
अशाप्रकारे संसाराच्या निःसारतेचे, क्षणिकतेचे पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने संसाराबद्दल विरक्ती येते. तेव्हा सर्वज्ञकथित धर्म जीवाला शांतता प्राप्त करून देतो. संसाराच्या दु:खातून वाचण्याचा मार्ग प्राप्त होतो. म्हणून करण्यायोग्य जर काही असेल तर केवळ चिंतन आहे. चिंतन केल्याने कर्माचे मंथन होते आणि आत्मशुद्धीचे नवनीत प्राप्त होते.
अज्ञानतेच्या भवामध्ये अशाप्रकारचे ज्ञान नव्हते परंतु आता तर मनुष्य जन्म मिळाला आहे. खरे ज्ञान मिळाले आहे. तर हे जीवा ! सावधान हो आणि ह्या संसाराच्या विविध गतींचे, विविध वेष धारण करून नवेनवे नृत्य करून जर थकले असाल, उद्विग्न झाले असाल तर इंद्रियांच्या विषयांनी उत्पन्न होणाऱ्या विकारांना दूर करा. कारण इंद्रियांच्या इष्ट अनिष्ट विकारांनी विकृत भाव होतात. आणि अशुभ कर्माचा बंध होतो. परिणामी चतुर्गतीरूप संसारात परिभ्रमण करता करता दुःख भोगावे लागते.१०२
"अनंत सौख्य नाम दुःख त्या रही न मित्रता." अर्थात ज्यामध्ये एकांतिक आणि आत्यंतिक सुखाचे तरंग उठतात अशा शील, ज्ञान इत्यादींच्या नाममात्र दुःखाने उद्विग्न होऊन त्यांना मित्ररूपात मानत नाही. त्यात भावना ठेवत नाही आणि
"अनंत दुःख नाम सौख्यप्रेम त्या विचित्रता" अनंत दुःखमय अशा ह्या संसारामध्ये नाममात्र सुख आहे. त्यात तुला परिपूर्ण प्रेम आहे ही किती विचित्र गोष्ट आहे !
"उघाड ज्ञाननेत्र ने निहाल रे ! निहाल तु"