________________
(३४०)
मुमुक्षू जीव असा विचार करतो की -
'यो संसार असार महान, सार आप में आपा जान |
सुख तै दुःख, दुःख ते सुख होय. समता चारो गति नहीं कोय ॥१०८ हा संसार असार आहे म्हणजे त्यात काहीच सार नाही. सार केवळ आपल्या स्वतःमध्येच आहे, आत्म्यात आहे. मनुष्य ज्यामध्ये सुख मानतो ते भौतिक पदार्थ, बाह्यभाव दुःखरूपी आहेत. व्रत, नियम, तप इत्यादींना दुःखरूप मानले जाते. परंतु ते सुख देणारे आहेत. ह्या चतुर्गती संसारामध्ये एकांतिक अथवा आत्यंतिक सुख कोठेच नाही. संसारामध्ये सुखाची इच्छा करणे हे पाण्याचे मंथन करण्यासारखे आहे.
मंथन करे दिन रात जल, घृत हाथ में आवे नहीं । रज-रेत पेले रात दिन पर, तेल जो पावे नहीं ।। सद्भाग्य बिन ज्यो संपदा मिलती नहीं व्यापार में ।
निज आत्मा के भान बिन त्यों सुख नहीं संसार में ॥१०९ पाण्याच्या मंथनाने तूप प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे सुखाचे साधन जोडण्यात, महाल सजविण्यात संपूर्ण जीवन व्यतीत होते आणि हाती काही लागत नाही, कारण इष्ट वस्तूला जोडणे हे बेडकाला तोलण्यासारखे असाध्य आहे.
तसेच जोपर्यंत एक संयोग जुळतो तोपर्यंत दुसरा विस्कळीत होतो. जेव्हा दात असतात तेव्हा चणे मिळत नाही आणि जेव्हा चणे मिळतात तेव्हा दात पडलेले असतात. ज्यांना दगड पचविण्याची शक्ती आहे त्यांना तूप, दुध मिळत नाही. ज्यांच्याकडे सर्वकाही- तूप, साखर, तेल, मीठ उपलब्ध आहे त्यांना हे सर्व खाण्याचे बंधन असते. ते केवळ मुगाच्या पाण्यावर स्वतःची गाडी चालवितात. ही वास्तविकता पाहिल्यानंतर संयोगात सुख शोधणे म्हणजे वेळ आणि शक्तीचा अपव्यय करण्यासारखे आहे हे स्पष्ट
होते.
परद्रव्यन ते प्रीति जो है संसार अबोध ।
ताको फल गति चार में भ्रमण कहयो श्रुत शोध ॥११० __ परद्रव्याच्या आसक्तीमुळे चतुर्गतीमध्ये भ्रमण करावे लागते. परद्रव्याचा राग वीतराग होण्यात बाधक आहे म्हणून ज्ञानचक्षू खोलून सांसारिक सर्व पदार्थामधील राग
ms