________________
H
(३४४)
दिला. तो पाहून महावीरांच्या डोळ्यात अनुकंपेचे अश्रू आले. ते विचार करू लागल की संगमने अज्ञानतेमुळे किती कर्माचे उपार्जन केले ? अशा दृष्टांतामुळे साधकाच्या अंतःकरणात प्रेरणाबळ, इच्छाबळ आणि निश्चयबळ येणे सुलभ होते. कसोटीच्या प्रसंगी समभावाने राहण्याची प्रेरणा मिळते, शक्ती मिळते.१११
बहु उपसर्ग कर्ता प्रत्ये पण क्रोध नहीं । वंदे चक्री तथापि न थाये मान जो ।। देह जाय पण माया थाय न रोममा । लोभ नहीं छो प्रबल सिद्धि निदान जो ॥११२
अपूर्व अवसर एवो क्यारे आवसे, जेव्हा उपसर्ग देणाऱ्याचा सुद्धा क्रोध येणार नाही, चक्रवर्ती राजांकडून पूजिले गेल्यावर अभिमान वाटणार नाही, अनेक शारीरिक कष्ट सहन करावे लागले तरी मायेचा भाव निर्माण होणार नाही आणि जरी सिद्धीचे निदान प्राप्त झाले तरी लोभ निर्माण होणार नाही तेव्हा साधनेची सिद्धी झाली असे समजले पाहिजे. ज्याला संसाराबद्दल उदासीनता प्राप्त होईल तो अवश्य परमपद प्राप्त करेल.
ही भावना भवचा म्हणजे जन्ममरणाचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून हेमचंद्राचार्यांसारख्या अनेक आचार्यांनी ह्या भावनेचे विस्तृत विवेचन केले आहे. हिला 'भव भावना'सुद्धा म्हणतात. श्रीमद् राजचंद्र यांनी ह्या भावनेला 'निवृत्तिबोध' असे नाव दिले आहे.
एकत्व भावना __ जैन दर्शन कर्मवादी आहे. प्रत्येक जीव आपल्या भविष्याचा निर्माता आहे. वस्तुतः कोणी कोणाचे चांगले करू शकत नाही किंवा वाईट करू शकत नाही. संसारात मनुष्य असे मानतो की अमुक माझा हितचिंतक आहे अथवा अमुक माझा शत्रू आहे. तो हितैषीच्या बरोबर मोहबद्ध राहतो आणि ज्यांना शत्रू मानतो त्यांच्याबद्दल त्याच्या मनात असहिष्णुता, क्रोध इत्यादी दुर्भावना राहते. ह्या संसाराचे चक्र अत्यंत विचित्र आहे. हे संसार भावनेत आपण पाहिले तरी मनुष्याची ही सर्वात मोठी चूक आहे की मी एकटा नाही. माझे अनेक मित्र, सगे-सोयरे आहेत. ते संकटात साथ देणारे आहेत. तो स्वतःला विसरतो. स्वतःला न जाणणे ही सर्वात मोठी चूक आहे. ही चूक जीवाच्या हातून न घडण्यासाठी एकत्व भावना आहे.