________________
(३४५)
हे परम सत्य आहे की जीव सर्वथा एकाकी आहे. परंतु तो हे कसे मानणार ? त्याच्या चहूबाजूंना आई-वडील आणि नातेवाईक यांची छत्र-छाया आहे. मित्र आणि स्वजनांचा स्नेहस्निग्ध परिवार त्याला मिळालेला आहे. प्रियतमेचे अविच्छिन्न प्रेम त्याला प्राप्त झाले आहे. परंतु प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ अशी येते की जेव्हा ते काहीच करू शकत नाही. जर तो असाध्य रोगाने पीडित झाला तर कोणीही त्याचे दुःख वाटून घेऊ शकत नाही. त्याला यमाच्या विक्राळ तोंडातून कोणी सोडवू शकत नाही आणि क्लेशाने अर्जित केलेल्या ज्या विपुल संपत्तीला तो स्वतःची समजून बसला आहे, ती निघून दुसरे तिचा उपभोग घेतात. म्हणून कोणी कोणाचा साथीदार, सहचर, रक्षक ह्या संसारात होऊ शकेल का ? अर्थात कोणीच नाही.
ठाणांग सूत्राच्या प्रथम स्थानामध्ये जेथे एकात्मक पदावलीचे वर्णन आहे तेथे "एगे आया' ११३ लिहिले आहे ते ह्याच भावनेचे द्योतक आहे.
आत्मा एक आहे असे जैन दर्शन मानत नाही. जैन दर्शनानुसार अनेक आत् आहेत. एकेका आत्म्याचे आपापले व्यक्तित्व, एकाकीत्व, स्वरूप, कर्म विद्यमान आहेत.
आत्माच आपल्या सुख-दुःखांचा कर्ता आणि विकर्ता आहे. सुप्रस्थित अर्थात सत्प्रवृत्तीत स्थित आत्माच आपला मित्र आहे आणि दुःप्रस्थित अर्थात दुष्प्रवृत्तीत स्थित आत्माच आपला शत्रू आहे. दुष्प्रस्थित आत्मा सर्व दुःखाचा हेतू असल्याने वैतरणी आहे, कुटशाल्मली वृक्ष आहे आणि सुप्रसिद्ध आत्मा सर्व सुखाचा हेतू असल्याने कामधेनू, नंदवनादीरूप आहे. ११४ एकत्व भावना ह्या सत्याला उद्घाटित उज्जागृत उद्भाषित करते.
हा प्राणी आत्म्याच्या दृष्टीने एकटा आहे. स्वतंत्र आहे. एकटाच आलेला असून एकटाच जाणारा आहे. परंतु सोने जेव्हा खाणीमध्ये असते तेव्हा ते मातीबरोबर एकरूप झालेले असते परंतु तरी त्यात शुद्ध सुवर्णत्व तर अवश्य असते. अशा मिश्र स्थितीमध्ये कोणी त्याला पाहिले तर त्याला सुवर्णरूपात मानण्यासाठीही तयार होत नाही. आत्म्याची पण हीच अवस्था आहे. ज्याप्रमाणे मातीयुक्त स्थितीमध्येही सुवर्णत्व असते त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची आत्मा कर्मयुक्त असतानाही त्यात शुद्ध आत्मभाव अवश्य राहतोच. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.
आत्मा जेव्हा संसारात भटकतो, नवे नवे वेष धारण करतो तेव्हा हा अनंत गुणांचा स्वामी असेल हे तर केवळ आत्मज्ञानीच सांगू शकतो. अत्यंत शक्तिशाली आत्मा ह्यावेळी पिंजऱ्यात बंद आहे म्हणून पिंजऱ्यात कोंडलेल्या सिंहाप्रमाणे त्याची शक्ती कुंठीत