________________
(३३६)
अशीच स्थिती संसारी मनुष्याची आहे. संसाराला आगमामध्ये ठिकठिकाणी "कांतार" म्हणजे घोर जंगल संबोधिले आहे. त्यात मनुष्य भटकत राहतो. भयंकर दुःखरूपी हत्ती त्याच्यामागे लागला आहे. त्याच्यापासून वाचण्यासाठी वृक्षाच्या फांदीरूपी धनसंपत्तीला पकडतो. खाली चार कषाय-क्रोध, मान, माया, लोभरूपी सर्प त्याला गिळण्याचा प्रयत्न करीत आहेत. विषयवासनारूपी मधमाशा त्याला डंख मारत आहेत, दिवसरूपी पांढरा उंदीर आणि रात्ररूपी काळा उंदीर ह्या जीवनरूपी फांदीला कापत आहे. परंतु भोगरूपी क्षणिक सुखापुढे त्याला काहीच सुचत नाही.
"सौख्य बूंदभर मिला कभी तो वह कबतक ठहरेगा ? ... अगले ही क्षण भोले प्राणी ! दुःख सागर लहरेगा । राईभर सुख के निमित्त क्यों दुःख सुमेरू भूलाया,
संतोके उपदेश को भी तूने हाय ! लजाया ॥१०१ मधबिंदुलोलुप मानवाची काय स्थिती होईल, हे प्रत्यक्ष आहे. तीच स्थिती संसारात सुख मानणाऱ्याची होईल. परंतु दुःखरूपी अग्नीतसुद्धा हा जीवात्मा जागृत होत नाही. मोहमदिरेच्या नशेने त्याला मूर्च्छित केले आहे. त्यामुळे त्याला संसारात भटकावे लागते.
__ हे सुख क्षणिक आहे हे कळत असूनही मनुष्य अनेक पापकर्माचे आचरण करत असतो. ही पापकर्मे पचविणे अत्यंत कठीण आहे. संसार दुःखमय आहे. पापमय आहे, तापमय आहे, संतापमय आहे असे चिंतन केल्यानेच जीवात्म्याला पापकर्मातून मुक्त होण्याची भावना होईल.
मोहांध, बुद्धी भ्रष्ट लोकांना संसरणाचे, पापाचे भय वाटत नाही. मात्र त्यांना दुःख नको आहे आणि दुःखापासून ते वाचूही शकत नाहीत. कारण जे पाप करतात त्यांना दुःख तर भोगावेच लागते, ते संसाराच्या दुर्गतीमध्ये संसरण करत राहतात.
संसारामध्ये अनेक प्रकारच्या चिंतेच्या अग्निज्वाला मनुष्याला जाळत असतात. काही चिंतेचे तर निराकरण होऊन जाते. परंतु त्याची पुन्हा आठवण करून लोक दुःखी होतात. काही चिंता 'दुसऱ्यांनी मला असे सांगितले तसे सांगितले' अशा इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टीच्या असतात. त्यातील अधिक तर खऱ्या सद्धा नसतात. परंतु मनुष्याला व्यर्थच चिंता करण्याची सवय पडलेली असते. काही चिंता आरोग्यविषयक असतात. आरोग्य दहा टक्के बिघडले तर चिंतेने मनुष्य दुप्पट करतो. मनुष्य सर्वात जास्त चिंता