________________
(३३२)
आपल्या दोषांना गुरूंच्या समोर जाऊन प्रकट करतो तो जीव पुण्यप्रकृतीचा बंध करतो. पुण्यवान पुरुषालासुद्धा दुःखे भोगावी लागतात. पूर्णपणे कोणीच सुखी नाही म्हणून मनुष्यगती दुःखदायी आहे.
मोठ्या कष्टाने हा जीव कधी देवगतीलासुद्धा जातो. परंतु तेथील मोठ्या ऋद्धीसंपन्न दुःख होते. देवांचे ऐश्वर्य पाहून मानसिक दुःख होते. महर्धिक देवांनासुद्धा इष्ट वियोगाचे शारीरिक रोगापेक्षा मानसिक दुःख हे अधिक होते.
अशाप्रकारे आपण पाहतो की, चतुर्गतीमध्ये कोठेच सुख नाही. संसार असार आहे. घोर दुःखाचा सागर आहे. त्यात कोठेच सुख नाही. अशाप्रकारे संसाराच्या स्वरूपाला समजून सर्वथा मोह सोडून आत्मस्वरूपाचे ध्यान केल्याने संसार परिभ्रमण नष्ट होईल. ९६ जो ह्या संसाराचे स्वरूप जाणत नाही तो चतुर्गतीरूपी संसारामध्ये परिभ्रमण करतो. ज्या संसारामध्ये सौभाग्य आणि रूपाचे गर्व करणारा युवक मरून स्वतःच्या शरीरातच किड्याच्या रूपात उत्पन्न होतो आणि मातासुद्धा पशू इत्यादीमध्ये जन्म घेऊन आपल्या पूर्व पुत्राचे मांस भक्षण करते. ह्यापेक्षा अधिक दुसरे दुःख कोणते असणार ? स्वामी जेथे सेवक आणि सेवक स्वामी होतो, स्वतःचा पुत्र पिता आणि पिता पुत्र होतो, जेथे पित्यालासुद्धा वैरभावनेने मारले जाते अशा संसाराच्या स्वरूपाचे दर्शन घडवणारे एक उदाहरण आहे.
कौशांबी नगरीच्या समारंभात तत्पर असणारे एक अत्यंत प्रसिद्ध 'तापस' नावाचे 'डुक्काराच्या अधर्मी शेठ, घराबद्दल तीव्र आसक्ती असल्याने मेल्यानंतर आपल्याच घरामध्ये रूपात जन्माला आले. तेथे त्यांना पूर्वजन्माचे स्मरण झाले. एकदा त्यांच्या पुत्राने त्याच्या (पित्याच्या) वार्षिक मृत्यूतिथीचा दिवस उजवण्यासाठी ब्राह्मण, संन्यासी, नातेवाईक इत्यादींना निमंत्रण दिले. त्या निमित्ताने स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने मांस शिजविले. परंतु त्या शिजलेल्या मांसाचा मांजर इत्यादी प्राण्यांनी नाश केला म्हणून घराच्या मालकाच्या भीतीने त्या स्त्रीने दुसरे मांस त्वरित न मिळाल्याने त्याच डुकराला मारून मांस तयार केले. तेव्हा मरून तो पुन्हा त्याच घरात सर्प झाला आणि स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पाहून त्याला मृत्यूच्या भयाने आर्तध्यान करता करता पूर्वजन्माचे स्मरण झाले. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने त्याला पाहून आरडाओरड केली, लोक एकत्रित झाले आणि त्या सर्पाला मारून टाकले. तो सर्प मरून पुन्हा आपल्याच पुत्राच्या पुत्ररूपात जन्माला आला. तेव्हा पूर्व जन्माचे स्मरण करून अशाप्रकारे विचार करू लागला की मी आपल्याच पुत्राला 'पिता'