________________
उत्पन्न होऊन नष्ट होते. हे इंद्र समजत असूनही त्यांच्या मरणाने दुःखी होतात. परंतु काळाचा प्रतिकार इंद्र आणि चक्रवर्तीसुद्धा करू शकत नाही. असे वाटते तपस्वी तरी काळाचा प्रतिकार करू शकत असतील. परंतु ते सुद्धा प्रतिकार करू शकत नाही. जे तत्त्वज्ञ महर्षी आहेत ते विचार करतात की बाह्य वस्तू शरीराचा जर मृत्यू होत असला तरी आत्मा तर शरीरापासून वेगळा आहे, नित्य आहे, आनंदमय आहे त्याला काहीच होत नाही.
इष्टोपदेशाच्या एकोणतिसाव्या श्लोकामध्ये अत्यंत सुंदर सांगितले आहे - "माझा मृत्यू होत नाही तर त्याने भय का ? मला व्याधी होत नाही तर मग कष्ट का ? मी बालक नाही, वृद्ध नाही, तरुण नाही ही सर्व परिवर्तने तर पुद्गलाच्या शरीराची आहेत."
असे चिंतन केल्याने 'मी नित्यशरणरहित आहे' असे समजून जीव सांसारीक भावामध्ये ममत्व ठेवत नाही आणि सर्वज्ञ प्ररूपित धर्मावर अनुराग ठेवतो, त्यांची शरण ग्रहण करतो.
पंडित आशाधर यांनी चक्रवर्ती इंद्र आणि योगेंद्र यांसारख्या उदाहरणांद्वारे मुमुक्षूला प्रेरणा दिली आहे की हा काळ केव्हा कोणाला ग्रास करून टाकेल ह्याचा भरवसा नाही.
हा काळ तिन्ही जगाला जिंकणारा अद्वितीय सुभट आहे कारण ह्याच्या केवळ इच्छेनेच क्षणात देवांचे इंद्र स्वर्गातून च्यूत होतात.७० त्यापुढे आचार्य शुभचंद्र यांनी अत्यंत सुंदर लिहिले आहे की, 'दुसऱ्यांचा मृत्यू झाल्यावर मूर्ख लोक शोक करतात परंतु स्वतः देखील यमराजाच्या दाढेत येऊन पोहचला आहे असा विचार करीत नाही आणि जेव्हापासून जीव गर्भावस्थेत येतो तेव्हापासून सतत आयुष्य कर्म जीवाला आपल्या भवनापासून यममंदिराजवळ नेत जातो हे सर्व माहित असतानाही विश्वास होत नसेल तर हे प्राणीमात्रांनो, यमराजाच्या आज्ञेचे उल्लंघन ज्यांनी केले आहे अशा एखाद्या बलवान पुरुषाला जर तुम्ही पाहिले असेल किंवा ऐकले असेल तर तू त्यांची सेवा कर म्हणजे त्यांची शरण घेऊन निश्चित होऊन राहा. आणि जर असा कोणी बलवान पुरुष बघितला नसशील किंवा ऐकला नसशील तर मग खेद करणे व्यर्थ आहे.
दुसऱ्यांची आपत्ती बघून हे समजत नाही की ही वेळ माझ्यावरही येईल. असंख्य प्राण्यांनी भरलेले जंगल जेव्हा जळते तेव्हा झाडावर बसलेला मनुष्य म्हणतो की, बघा ! हे सर्व प्राणी जळत आहेत परंतु हा विचार करीत नाही की जेव्हा हा वृक्ष जळेल तेव्हा मी सुद्धा असाच जळून जाईल. हा काळ समदर्शी आहे. बालक, वृद्ध, धनी, दरिद्र बीर