________________
(३२२)
● आहे आणि अनंतकाळापर्यंत राहील. कधी असे झालेले नाही की संसाराचे आस्तित्व राहिले नाही आणि भविष्यकाळातही तसे कधी होणार नाही. हा संसार भूतकाळात होता, वर्तमानामध्ये आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. तरी इतके स्पष्ट आहे की हा नेहमी एकसारख्या स्वरूपात राहत नाही. क्षणोक्षणी बदलत राहतो.
"जो जीव वीतराग प्ररूपित मार्गामध्ये श्रद्धा ठेवीत नाही तो जन्म, जरा, मृत्यू, रोग इ. भयांपासून परिपूर्ण पंचविध संसारामध्ये अर्थात पुद्गल परावर्तन, क्षेत्रपरावर्तन, काळ परावर्तन, भवपरावर्तन आणि भावपरावर्तनरूपी संसारामध्ये दीर्घकाळापर्यंत परिभ्रमण करत राहतो. '
एक जीव जेव्हा संसाराच्या समग्र पुद्गलांना कोणत्या ना कोणत्या रूपात भोगून घेतो त्याला 'पुद्गल परावर्तन' म्हणतात.
एक जीव जेव्हा समस्त क्षेत्राला संस्पर्श करून घेतो ते 'क्षेत्र परावर्तन' होय. सर्व काळात वर्तन करतो अर्थात जन्ममरण करून घेतो ते कालपरावर्तन आहे. सर्व भवांमध्ये अर्थात चतुर्गतीमध्ये भ्रमण करून घेतो ते भवपरावर्तन आहे. सर्व भावांमध्ये मिथ्यात्वाला वश होऊन अनुवर्तीत होतो हे भावपरावर्तन किंवा 'भाव संसार' आहे.
जो पुत्र, पत्नी इत्यादींसाठी पापबुद्धीने धन कमवतो आणि दया, दान करीत नाही तो जीव संसारामध्ये भ्रमण करत राहतो. प्रत्येक 'पर' पदार्थामध्ये ममत्व भाव ठेवतो. मिथ्यात्वाच्या उदयामुळे वीतराग प्रभूंद्वारे प्ररूपित धर्माची निंदा करतो आणि मांस व मदिरेचे सेवन करतो, पर धन पर स्त्री यांचे अपहरण करतो असा मोहांध जीव नेहमी पाप करत राहतो व तो या संसारात परिभ्रमण करीत राहतो. ८१
इथे आचार्य कुंदकुंद यांनी सप्त व्यसनांपैकी काही व्यसनांचा नामोल्लेख केला आहे. त्यांना संसार परिभ्रमणाचे कारण सांगितले आहे.
सम्यगदृष्टी जीवाला इहलौकिक किंवा पारलौकिकीचे भय नसते. जो आत्मज्ञानी आहे त्याला स्वतःची ओळख होते, त्याला भय वाटत नाही, भय अज्ञानी मनुष्याला वाटते. ज्यांना भय वाटत असते त्याला अनंत संसार आहे.
याविषयी आचार्य उमास्वाती लिहितात की हा जीव संसारात परिभ्रमण करत करत नरक, तिर्यंच, मनुष्य आणि देव ह्या चार गतींमध्ये गाडीच्या चाकाप्रमाणे परिभ्रमण करत आहे. म्हणजे सर्व संसारी जीव ह्याचे स्वजन अथवा परिजन आहेत असे म्हणता येईल. स्वजन - परिजन यांची विशिष्ट व्यवस्थाही नसते. कोणी एकच जीव माता, बहीण,