________________
(३२१)
असा 'पर' पदार्थ नाही की जो मला शरणरूप होऊ शकेल, माझे रक्षण करू शकेल. जेव्हा ही अशरण भावना जीवनामध्ये साकार रूप घेईल तेव्हा व्यक्तींच्या मनात पदार्थांची आसक्ती राहणार नाही. शरीराचा मोह राहणार नाही, कोणाबद्दलही ममत्व राहणार नाही आणि जेव्हा मोह, ममत्वाची आवरणे दूर होतील तेव्हा दुःख आणि क्लेशसुद्धा राहणार नाहीत. जीवनामध्ये निर्लेपता आणि जागृततेचा विकास होईल. परमार्थाच्या अनुचिंतनात मन एकाग्र होईल. सत्यनिष्ठ धर्माचा जीवनात उपयोग होईल, आणि आपल्या आत्मशक्तीचा विकास होईल. हे ह्या भावनेच्या चिंतनाचे फळ आहे.
ह्या भावनेच्या चिंतनाने लक्षात येते की सामाजिक जीवनात जो शरणरूप होतो तो तात्कालिक सत्य स्वरूप आहे. त्रैयकालिक सत्य तर हे आहे की स्वतःच्या पुरुषार्थावर मनुष्याला विश्वास होणे. स्वतः स्वतःच्या शरणाची शोध करणे. असे केल्याने मनुष्याचे कर्तृत्व दृढ होते. दुसऱ्यांनी विश्वासघात केला तर तो धैर्याने विचलित होत नाही. संसार भावना
प्रथम दोन भावनेमध्ये आपण पाहिले की ज्या भौतिक, पौद्गलिक वस्तू आहेत त्या सर्व नाशवंत आहेत, क्षणिक आहेत. त्या कोणीच जीवाला शरणरूप होऊ शकत नाही. जे अजर, अमर, अविनाशी आणि शाश्वत आहे असे तत्त्वच शरणरूप होऊ शकते. संसार भावनेचे वर्णन करताना हे स्पष्ट केले आहे की, जी व्यक्ती जागतिक पदार्थांची अनित्यता, अशरणता जाणत नाही, जी व्यक्ती त्यात लिप्त राहते, जी भौतिक वासना, एषणा आणि भोग यामध्ये भ्रांत आहे ती व्यक्ती असा विचार करते की ह्या सर्व गोष्टींपासून जेवढा आनंद लुटता येईल तेवढा लुटून घ्यावा. या संदर्भाची चार्वाक दर्शनातील एक उक्ती प्रसिद्ध आहे
-
'ऋणं कृत्वा घृतं पिबेत् यावत् जीवेत् सुखं जीवेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥
अर्थात जोपर्यंत जगायचे तोपर्यंत सुखाने जगावे. ऋण कर्ज काढून तूप प्राशन करावे, शरीर जाळून टाकल्यानंतर कोण पुन्हा येणार आहे ? अशाप्रकारे अज्ञान आणि मोहामुळे बाह्यवस्तूंमध्ये प्रिय वस्तूंबद्दल 'राग' आणि अप्रिय वस्तूंबद्दल द्वेष उत्पन्न होतो अशा मनोवृत्तीला संसार म्हणतात.
'संसार' शब्द 'सम्' उपसर्ग आणि 'सृ' धातूने निष्पन्न झाला आहे. अर्थात जो सतत संसरणशील आहे, बदलत राहतो तो संसार आहे. हा संसार अनादी काळापासून