________________
(३१७)
छिद्रमय हो नाव डगमग चल रही मझधार में । दुर्भाग्य से जो पड गई दुर्देव के अधिकार में ।। तब शरण होगा कौन जब नाविक डुबा दे धार में ।
संयोग सब अशरण, शरण कोई नहीं संसार में ॥७९ छिद्रयुक्त जहाज समुद्राच्या मध्यभागी चालत आहे, दुर्भाग्याने दुर्देवाच्या अधिकारात पडली आहे. जेव्हा नाविक स्वतःच त्या जहाजेला बुडविण्यास तयार झाला आहे तर दुसरे कोण त्याला वाचवू शकणार ? हे स्पष्ट समजण्यासारखेच आहे की सर्व संयोग अशरण आहे. ह्या संसारात कोणी शरणरूप नाही. जर बाह्य संयोग शरणरूप झाले असते तर ज्यांच्याजवळ धनाचे खजिन भरलेले होते असे जीव अनादी काळचे धनी सर्व ह्या भूतलावरच राहिले असते. परंतु असे कधीही झाले नाही आणि होणार नाही. राजपाट सर्वकाही सोडून जीव एकटाच निघून जातो. त्याला कोणी आपले आयुष्य देऊ शकत नाही. दहाही दिशांना आपली दृष्टी पसरवून कणाकणामध्ये पाहिले तरी कोणी रक्षक होऊ शकेल अथवा ज्यांच्या शरणी मृत्यूचे निवारण होऊ शकेल असा कोणीच दृष्टीगोचर होत नाही.८०
ज्यांनी चार घाती कर्माचा संहार केला आहे, मोहांध जीवाला ज्यांनी धर्म प्रदीप दिला आहे, जे सर्वज्ञ आहेत, विश्वाचे उपकारक आहेत, ह्या जगाचे तारक आहेत, ह्या जगात केवळ तेच शरणरूप आहेत. कालजयी सिद्ध भगवान, साधू आणि जैन धर्म ह्यांची शरण अनुपम मंगलकारी आहे. ह्या भवसागरामध्ये ह्यांच्या शिवाय दुसरे कोणीच शरणरूप नाही.
___ अशरण भावनेमध्ये जगातील सर्व पदार्थांच्या अशरणतेचे वर्णन केलेले आहे. जे भौतिक पदार्थ स्वतः असुरक्षित आहेत ते दुसऱ्यांचे रक्षण करू शकत नाहीत. मनुष्याला हे सर्व समजते. परंतु व्यवहारामध्ये आपण असे पाहतो की मुलांमध्ये भांडण होतात आणि एखाद्या मुलाला दुसऱ्या मुलाने मारले तर तो मुलगा रडत रडत आपल्या आईवडीलांच्या शरणी जातो. ते आपल्या मुलाला शांत करून दुसऱ्या मारणाऱ्या मुलाला शिक्षा करतात. एखादा रोगी रोगाने ग्रस्त, दुःखी होतो तेव्हा तो परोपकारी वैद्य, हकीम किंवा डॉक्टर यांच्या शरणी जातो. तो वैद्य औषध देऊन रोग्याचा रोग दूर करतो. रोग्याला शांतता मिळते. चोर लुटऱ्यांच्या त्रासाने दुःखी प्रजा राजाला शरण जाते. राजा त्यांचे दुःख ध्यानपूर्वक ऐकून दूर करण्याचा प्रयत्न करतो. कोणी राजा युद्धात पराजित झाला तर