________________
(३१६)
द्वैपायनऋषी जे तापसदेव झाले त्यांनी द्वारकानगरीला जाळून टाकली. परंतु बलशाली श्रीकृष्णवासुदेव आणि बलरामासारखे मोठे मोठे सम्राट राजे असताना सुद्धा ते काहीच करू शकले नाहीत. परंतु ज्यांनी भगवान नेमिनाथ स्वामींची शरण घेतली ते शाश्वत धामी पोहचले. ७५
स्वतः कृष्णमहाराजांचे चक्ररत्न आणि हलधरांसारखा भाऊसुद्धा सहायता करू शकला नाही. एक बाण लागताच कृष्णाच्या देहाचा विनाश झाला. ७६
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की कोणी कोणाच्या दुःखाला वाटून घेऊ शकत नाही. “अन्नरस दुक्खं अन्नो न परियाइयति'७७
जेव्हा मनुष्यावर दुःख येऊन कोसळते तेव्हा तो लहानसे तोंड करून चहूकडे दीनपणे आश्रय शोधतो. परंतु कोठेच काही स्थान दिसत नाही.
७८
ह्या जीवाने अनंतकाळापासून संसारात परिभ्रमण करता करता वेगवेगळ्या गतीमध्ये अनंत जीवांची शरण घेतली. सैनिक झाला तर राजाची शरण घेतली, नोकर झाला तर मालकाचे हुकूम स्वीकारावे लागले. नारक झाला तर परमाधामीदेवा समोर लाचारी दाखवली, पुत्र झाला तर पित्याची आज्ञा स्वीकारावी लागली, पत्नी झाला तर पतीची आज्ञा स्वीकारली. परंतु दुःखाची गोष्ट तर ही आहे की अनंत जीवांमधून एका जीवाची सुद्धा शरणागती आपल्याला सुरक्षित ठेवू शकली नाही, कारण ते जीव स्वतःच असुरक्षित होते, त्यांचे स्वतःचेच आस्तित्व धोक्यात होते. त्यांची संपत्ती लुटली जाण्याची शंका होती. मृत्यूच्या भयाने सर्वजण आपले जीवन व्यतीत करीत होते. असे असुरक्षित आत्मे दुसऱ्यांना सुरक्षित कसे करतील ? वाळूचे घर तुफानात दुसऱ्यांना आश्रयरूप कसे बनू शकतील ? ह्या जीवाने स्वतः आपल्या सुरक्षिततेसाठी अनेक जन्मात अनेक सुविधा केल्या. मुंगीच्या जन्मात सुरक्षेसाठी वारूळ बनविले. परंतु गाडीचे चाक त्याच्यावर फिरले आणि जीव असुरक्षित झाला. पशूच्या जन्मात गुफा बनवली. परंतु भुकंपाच्या एका धक्काने गुफा तुटून गेली, जीव असहाय झाला. मनुष्याच्या जन्मात सुरक्षितेसाठी संपत्तीचा संग्रह केला. सर्व सुविधांनी युक्त बंगला, गाडी, नोकर-चाकर ठेवले आणि स्वतःला सुरक्षित समजू लागला. परंतु मृत्यूमुखातून स्वतःला वाचवू शकला नाही.
देव भवामध्ये आकर्षक विमानात बेडा झाला. परंतु तेथील आयुष्य पूर्ण होताच तेथून काढून टाकले. प्रत्येक जन्म असहायदशेत पूर्ण केले. प्रत्येक जन्म अनाथ म्हणूनच घालवले तरी जीवात्मा बाह्य वस्तूतच आपली सुरक्षितता मानतो ही त्याची किती मोठी भ्रांती आहे.