________________
(३०३)
संयोगाबरोबरच वियोगाची धारा प्रवाहमान होते.४७
चक्रवर्ती सम्राट भरत जेव्हा राज्यसिंहासनावर येऊन बसत होते तेव्हा सर्वप्रथम असेच चिंतन करायचे -
"असारं संसारे भवति सर्व यन्तयनगम्" ह्या असार संसारामध्ये चक्षुगोचर सर्व वस्तू साररहित आहेत. भरत अनित्य भावनेचे चिंतन यासाठी करत होते की वैभवाचा मोह मनात जागृत होऊन आत्मविस्मृती होऊ नये. सुवर्ण सिंहासनावर बसूनही स्वतःला त्यापासून भिन्न समजत होते. म्हणून भगवान ऋषभदेवांनी सहा खंडाचे अधिपती असतानाही त्यांना अल्प परिग्रही म्हटले होते. कारण परिग्रह पदार्थाच्या संख्येमध्ये आणि पदार्थामध्ये नसून त्यात असलेल्या ममत्वात, तृष्णेत आहे. म्हणूनच चक्रवर्ती भरत रोज अनित्य भावनेचे चिंतन करीत होते. ज्यामुळे पदार्थाची आसक्ती कमी करण्याचे भाव दृढ होत होते. अशी चिंतनधारा जेव्हा प्रबळ झाली तेव्हा शिशमहालामध्ये शरीराला अलंकृत करता करता, शृंगार करता करता त्यांना केवलज्ञान, केवलदर्शन प्राप्त झाले. अनित्य भावनेच्या चिंतनामध्ये तेजस्विता येताच आणि आंतरदृष्टी जागृत होताच चक्रवर्ती भरत क्षणात अध्यात्मयोगी झाले. भवबंधनाचा नाश करून अक्षय, अमर आणि अविनाशी पद प्राप्त केले.
अनित्य भावना साधकाला आपली दृष्टी बाहेरून दूर करून अंतर्मुख करण्याची प्रेरणा देते. जेव्हा साधक आंतरद्रष्टा होतो तेव्हा बाह्य पदार्थाच्या अनित्यतेला यथार्थ रूपाने समजून घेतो. जेव्हा मोहाचा पूर्णपणे नाश होतो तेव्हा तो आपल्या शुद्ध स्वरूपात स्थिर होतो. आपल्या स्वभावात परिणमण करणे हेच अनित्य भावनेच्या चिंतनाचे फळ आहे. या चिंतनात जितकी स्थिरता आणि एकाग्रता येईल तितकाच आत्म्याचा विकास होईल. आगमामध्ये अनित्यतेला सर्वांगीण मान्न धर्मामध्ये उद्यम करणाऱ्या साधकाची अनेक उदाहरणे आहेत. त्यात निग्गति (निग्गई) राजाचा दृष्टांत प्रसिद्ध आहे. हे चार प्रत्येकबुद्धांपैकी एक होते.४८
दृष्टांत - घोडे, हत्ती, रथावर बसलेल्या अनेक सामंत राजाच्या समूहाने घेरलेले अती ऋद्धीने सुशोभित असणारे गंधार देशाचे स्वामी नग्गति राजा, वसंतऋतूच्या आगमनामुळे शोभायमान उद्यानाला पाहण्यासाठी त्या सर्वांना बरोबर घेऊन नगरातून निघाले. तेथे जाताना अर्ध्या रस्त्यामध्ये एका अत्यंत विकसित आम्रवृक्षाला राजाने पाहिले. मोठ्या पानांनी सुशोभित पुष्पांच्या रसबिंदूने पिवळ्या झालेल्या मंजिरीच्या समुहाने रमणीय, ज्यावर