________________
(३००)
त्याचे उच्चारण केले.
चौथा चरण ऐकून राजाने आवाजाच्या दिशेने येऊन विचारले, 'तू कोण आहे विद्वान म्हणाला ः ‘चोर आहे.' राजा हे ऐकूण आश्चर्यान्वीत झाला. पण माझ्या बुद्धीत असे कुसंस्कार पडले की मला चोरी केल्याशिवाय शांती मिळत नाही. आज मी इथे
करण्यासाठीच आलो पण अजून मी काहीच घेतले नाही, त्या पूर्वीच आपले शब्द ऐकून आपणास योग्य मार्गी आणण्यासाठी आपल्या पदाची पूर्ती केली. आता तुम्हाला जी शिक्षा करायची असेल ती करा.
राजा भोजचे डोळे उघडले त्यांनी त्या चोराच्या विद्वतेचा सन्मान करून त्याला मुक्त केले आणि बक्षीससुद्धा दिले. ४१
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार अशोभनीय आहे. अहंकार करणारा राजा असो किंवा रंक. परंतु जीवन तर क्षणभंगुर आहे.
म्हणून श्री जयमलजी महाराज लिहितात की
तन, धन, यौवन अथिर छे मुरख मत कर मान
उपमा दिजे एहवी जेवो संझानो वान रे ।
पाको पीपल नो पान रे जेहवो कुंजर नो कान रे
डा अनि बिंदु समान रे, पाणी लहर प्रमाण रे
एवो आउखा तू जान रे तु तो चेत चेत रे प्राणिया । ४२
संध्येचा रंग, पिकलेले पिंपळाचे पान, हत्तीचे कान, कुशाग्रावर असलेला जलबिंदू आणि पाण्याची लाट अस्थिर आहे. त्याचप्रमाणे आयुष्यही अस्थिर आहे. म्हणून हे मानवा,
तू जागृत हो. अभिमान करू नकोस. कारण अभिमान कोणाचाही टिकत नाही.
दहला देता था वीरों का जिन का एक इशारा, जिनकी उंगलीपर नचता था यह भूमंडल सारा, थे कल तक जो शूरवीर रणधीर अभय सेनानी
पडे तडपते आज न पाते हैं चुल्लूभर पानी । ४३
सर्व पर पदार्थ आणि जीवनही अनित्य आहे. जेव्हा अनित्यतेचे चिंतन समोर