________________
(२९९)
अर्थात सागरोपम, जे काळाचे सर्वाधिक मोठे प्रमाण आहे ते सुद्धा पूर्ण होऊन
जाते.
तर मनुष्य सत्कार्य नंतर करेल असा विश्वास ठेवू शकत नाही. कारण हिंदीमध्ये से सांगतात की, "कल कल करते, काल आकर खडा हो जायेगा' केव्हा काळ येऊन पाण्याला आपला ग्रास करेल हे सांगता येत नाही. त्याचा काही विश्वास नाही.
"आये गये यहाँ कितने ही, गिनती इसकी कौन करे, लिखनेवाला स्वयं दुसरा हस्ताक्षर फिर कौन करे,
खेल अनादि काल का है यह टूट नहीं सकता है क्रम,
मैं हूँ अमर, अमर मेरा धन, यही मूर्खपन झूठा भ्रम ।४० राज्य, वैभव, पुत्र, पत्नी, स्वजन, धनधान्यादींचा संयोग झाला तरी हे माझे आहे या भ्रमाला तोडण्यासाठी एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे
एकदा राजा भोज यांनी राज्यवैभवाविषयी अहंकार मनात धरून एका पदाच्या तीन चरणांची रचना केली परंतु चतुर्थ चरणाची रचना ते करू शकत नव्हते. राजमहालामध्ये चोरी करण्यासाठी एका विद्वान चोराने प्रवेश केला. राजा भोज आपल्या रचलेल्या श्लोकाच्या तीन चरणांचे पुन्हा पुन्हा पठन करताना म्हणत होते -
"चेतोहरा युवतयः स्वजनोऽनुकूलः सद्बांधवाः प्रणयगर्भगिरश्च भृत्याः।
गर्जन्ति दन्तिनिवहास्तरलास्तुरंगा." अर्थात - माझ्या मनोहर स्त्रिया आहेत. अनुकूल स्वजन आहेत, सबंधू आहेत, स्नेहासिक्त वाणी बोलणारे सेवक आहेत, गर्जना करणारे हत्ती आहेत आणि चंचल घोडे आहेत हे ऐकून चोराने श्लोकाच्या अंतिम चरणाची रचना करताना म्हटले,
'संमीलने नयनयोर्नहि किंचिदस्ति ॥' अर्थात डोळे बंद झाल्यावर हे सर्व काही नसणार. तुमचे वैभव डोळे बंद झाल्यावर नष्ट होईल असे सांगून त्या विद्वान चोराने राजाला वैभवाच्या अनित्यतेचे ज्ञान देण्याची हिंमत केली. मी चोरी करण्यासाठी आलो आहे पकडला गेलो तर माझे काय हाल होतील ह्याचे विचार देखील त्याने केला नाही. विद्वानाच्या उपकार करण्याचा स्वभाव असतो तो उपकार करण्याची क्षण व्यर्थ घालवत नाही आणि म्हणूनच चौथा चरण त्याने पूर्ण करून