________________
(२९२)
आली तर ज्याप्रमाणे सर्प मंत्राद्वारे वशिभूत होतो त्याचप्रमाणे तृष्णेवर साधक ताबा
ठेवू शकतो.
ज्यांनी तृष्णेवर विजय मिळवला तो समजतो की संसारामध्ये 'इष्ट'चा वियोग 'अनिष्ट'चा संयोग पूर्वकृत कर्मामुळे होतो. म्हणून दुःखी होऊन काय फायदा ? या पापकर्माच्या नाशाचाच प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे पुढे इष्ट वियोग आणि अनिष्ट योग होऊ शकणार नाही. मनोहर वस्तू नष्ट झाल्यावर जर शोक केल्याने काही फायदा होत असेल, किर्ती मिळत असेल, सुख मिळत असेल अथवा धर्म होत असेल तेव्हा तर शोक करणे, दुःख मानणे योग्य होईल. परंतु जेव्हा किर्ती, सुख इत्यादींची प्राप्ती होत नसेल तर कोणता बुद्धिमान मनुष्य व्यर्थच त्या शोकरूपी महाराक्षसाच्या अधिन होईल ? अर्थात कोणीच नाही.२४
_ जर लावण्य, यौवन, सुंदरता इत्यादी गुण वास्तविक रूपाने मनोहर असते तर संतांनी यांना त्यागण्याचा प्रयत्न का केला असता ? तिर्थंकर, चक्रवर्ती राजा, महाराजा हे जाणत होते की संपत्ती जेव्हा प्राप्त होते तेव्हा प्राणी उच्च स्थानाला प्राप्त करतो. परंतु एक वेळ अशी येते की तुफानाप्रमाणे चंचल संपत्ती क्षणात निघून जाते आणि तो उच्च पदस्थ प्राणी अध:पतित होतो. तेव्हा जरी तो शूर, विनम्र, उच्चकुलोत्पन्न, सज्जन महान विद्वान आणि धार्मिक असला तरी लक्ष्मी निघून जाते. ती तशीच जात नाही तर जाता जाता चिंतारूपी ज्वर उत्पन्न करून जाते त्यामुळे जीवन कलूषित होते, दुःखी होते.२७
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की ज्ञानी, लक्ष्मीच्या स्वभावाला समजून शोक करत नाही. जे अज्ञानी ह्या जागतिक पदार्थाच्या नश्वरतेला समजत नाही त्यांना समजविण्यासाठी आचार्य शुभचंद्र मानवाला संबोधून म्हणतात, 'अरे ! मूर्ख मानवा ! प्रतिक्षण नश्वर, इंद्रियजनित सुखामध्ये आसक्त असल्याने हे तिन्ही लोक नाशाला प्राप्त होत आहेत. काय हे सर्व तू पाहत नाहीस ? ह्या संसाररूपी समुद्रामध्ये भटकणाऱ्या मनुष्याचे जितके संबंध आहेत ते आपत्तींनी परिपूर्ण आहेत. कारण ते शेवटी एकदम नीरस आहे, त्यात सुख मानणे हा प्राण्याचा भ्रम आहे.'२६
'शीर्यते इति शरीरं' जे शीर्ण होते, नष्ट होते ते शरीर आहे. या व्युत्पत्तीच्या आधारे आचार्य शुभचंद्रांनी एक श्लोक लिहिला आहे -
शरीरं शीर्यते नाशा, गलत्यायुर्न पापधीः । मोहः स्फुरति नात्मार्थः पश्य वृत्तं शरीरिणाम् ।।