________________
(२९६)
भयंकर सोळा महारोगांच्या आगमनाने नष्ट झाले आणि देवांकडून जेव्हा हे माहीत र तेव्हा चक्रवर्ती शरीराच्या सौंदर्याप्रमाणे सहा खंडांची राज्यसंपत्ती संपूर्ण अनित्य जन चिंतन मनन करत करत प्रतिबुद्ध झाले आणि संसार सोडून अनगार बनले.
श्री रामचंद्रजींचे पूर्वज 'राजा किर्तीधर' यांनी सूर्याच्या प्रखर तापाला राहूच्या महणाने आवृत्त पाहिले आणि संसारच्या सर्व रंगाला सुद्धा अल्पकालीन समजून संसाराचा
परित्याग केला.३४
अनित्याचे साम्राज्य कसे विश्वव्यापी आणि बलवान आहे हे समजून अशा क्षणिक प्रसंगात काय रममाण व्हायचे ? श्रीमद् राजचंद्र ह्या विषयाला स्पष्ट करण्यासाठी सांगतात
"विद्युत लक्ष्मी प्रभुता पतंग, आयुष्य ते तो जलना तरंग
पुरंदरी चाप अनंग रंग, शुराचिओ त्या क्षणनो प्रसंग ।'३५ , ज्ञानी पुरुषांनी लक्ष्मी इत्यादी वैभवाला विजेच्या लखलखाटाप्रमाणे, अधिकाराला फुलपाखराच्या रंगाप्रमाणे, आयुष्याला पाण्याच्या तरंगाप्रमाणे आणि कामविकाराला इंद्रधनुष्याप्रमाणे सांगितले आहे. म्हणून ह्या सर्वामध्ये रममाण होण्यासारखे, आकृष्ट होण्यासारखे काहीच नाही. जे क्षणिक आहे त्याच्या मोहात अडकण्यासारखे काही नाही.
___ लक्ष्मी अनित्य आहे. ती कुलीनाजवळ किंवा धीराजवळ राहत नाही तसेच पंडित, मूर्ख, सुरूप, कुरूप, पराक्रमी, निर्बळ, धर्मी, अधर्मी, कंजूस, उदार अशा कोणाहीजवळ स्थिर रहात नाही. ती स्वभावानेच चंचल आहे. ज्यांनी पूर्व जन्मात काही पुण्य केले असेल त्यांच्याच जवळ राहते. जर तिचा उपयोग भोगामध्ये कमार्गामध्ये अथवा मद्यपान इत्यादींमध्ये केला तर ती दुर्गतीला पोहचविते. लक्ष्मी बुद्धी नष्ट करते. तिच्या वियोगात जगातील जीव जणुकाही अचेतनामय होतात. ती अनेक जीवांना छळते, अधोगतीला नेते. जर तिचे दान केले नाही अथवा तिचा उपभोगही घेतला नाही आणि ती तशीच नष्ट झाली तर आर्तध्यान करत करत जीव तिर्यंच गतीमध्ये जातो. जर पूर्व पुण्याने आपल्याजवळ लक्ष्मी असेल तर तिला क्षणभंगुर समजून दुःखी जीवांचे दुःख दूर करण्यासाठी, धर्माची वृद्धी करण्यासाठी, विद्येच्या विकासासाठी, वीतरागाद्वारे प्ररूपित सिद्धांताच्या प्रचारामध्ये विनियोग करून सफल करा. आपल्या आत्मोन्नतीचे हे एक प्रमुख साधन आहे.
ह्या संसारामध्ये अधिकारी लोक आपल्या सत्तेच्या अभिमानामध्ये न्याय व अन्याय यांचा विचार केल्याशिवाय अनेक प्रकारचे जुलूम करतात. परंतु हे अधिकार