________________
उपाध्याय विनयविजय यांनी अनित्यतेचे वर्णन करताना लिहिले आहे. 'हे जीवा ! तू आपले कुटुंबादी सांसारिक वैभवाचा विचार करून व्यर्थच मोहित होत आहे कश-डाभाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या बिंदूप्रमाणे सर्वकाही क्षणिक आहे. हे अपयिक सुख चमकणाऱ्या विजेप्रमाणे क्षणात लुप्त होणारे आहे. हे यौवन कुत्र्याच्या कोपटीप्रमाणे कुटील आहे. हे वृद्धावस्थेत परिणत होते. जो दुर्जय आहे त्याला कोणीही भांबव शकत नाही. ते सत्त्वहीन, क्षीण आहे. तरीही मन किती निर्लज्ज आहे, ते कुत्सित कर्मविकारांना सोडत नाही. अनुत्तर विमानाने सर्वश्रेष्ठ सुखही नष्ट होते तर सांसारिक पदार्थांच्या सुखाच्या स्थिरतेची गोष्ट काय ? ज्यांच्या बरोबर क्रिडा केली, गोष्टी केल्या त्या सर्वांना भस्मिभूत होताना पाहूनही तुम्ही निश्चित होऊन निःशंकपणे विचरण करता अशा प्रमादाचा धिक्कार आहे. समुद्राच्या लाटेप्रमाणे सर्व सजीव, निर्जीव पदार्थ निर्माण होतात आणि विलिन होतात. स्वजन आणि धनाचा संयोग इंद्रजालाप्रमाणे, जादूगाराच्या खेळाप्रमाणे आहे. हे मूर्ख जीव त्याच्यातच अनुरक्त होतात. स्थावर तथा जंगम जगाला नेहमी भक्षण करणारा हा काळही तृप्त होत नाही. ह्या काळाच्या विळख्यात सापडलेले आपण कोणीही सुटू शकणार नाही. म्हणून नित्य, चिदानंदमय आत्मस्वरूपाला जाणून प्रशमरसरूपी अभिनव अमृतपानाद्वारे आध्यात्मिक आत्मसुखाचा अनुभव घेतला पाहिजे.३१
श्री मुनी सुंदरसूरी यांनी ह्या बाह्य पदार्थाचे ममत्त्व सोडण्यासाठी अत्यंत प्रेरक शब्दात म्हटले आहे - हे जीवा ! ज्या स्त्रियांची वाणी तुला स्नेहासक्त आणि मधुर वाटते त्यावरील प्रितीमुळे तू मोहीत होतो. परंतु भव सागरामध्ये पडणाऱ्या प्राण्यांसाठी त्या स्त्रिया गळ्यात बांधलेल्या दगडाप्रमाणे आहेत.३२
'तू मुलाला, मुलीला पाहून हर्षोन्मत्त होऊ नकोस. कारण मोहराज नावाच्या तुझ्या शत्रूने तुला नरकरूपी कैदेत टाकण्याच्या इच्छेने ह्या पुत्र-पुत्रीरूपी लोखंडाच्या साखळीने तुला जखडून टाकले आहे.३३
म्हणून हे भव्यात्मा अनित्य पदार्थाचा मोह सोडून जिनेश्वर भगवंतांनी दाखविलेल्या धर्माप्रती प्रेम, आस्था आणि आदराचा रंग धारण कर.
अनित्यतेची अनेक ऐतिहासिक उदाहरणे सर्वांना माहीतच आहेत. ज्याप्रमाणे एका काळच्या सन्माननीय 'मुंज' राजाला दुश्मन राजांच्या ताब्यात जावे लागले आणि घरोघरी भीक मागून खाण्याची वेळ आली, राज्य, संपत्ती इत्यादी कोठे स्थिर राहिले ? सनत्कुमार चक्रवर्तीच्या ज्या शरीराची इंद्र प्रशंसा करत असे त्यांचे अनुपम सौंदर्यसुद्धा