________________
(२९१)
शरीरधारी प्राण्यांसाठी हे शरीरच एक असा आधार आहे जे समस्त पुरुषार्थ त धर्म, अर्थ, काम आणि मोक्षमूलक लक्ष्य सिद्ध करण्यासाठी आधाररूप आहे. सारामध्ये शरीर हा पहिला पदार्थ आहे ज्याद्वारे प्राणी सर्व काही साधू शकतो. म्हणून सीवाला शरीराविषयी आसक्ती निर्माण होते. उपयुक्त, प्रिय व मूल्यवान वस्तूची आसक्ती असणे हा मानवी स्वभावच आहे. ती आसक्तीच त्याला असे मानण्यासाठी प्रेरित करते की तो कधीही नष्ट होणार नाही आणि म्हणूनच तो मृत्यूच्या नावाने भयभीत होतो. ते मृत्यूचे नाव सुद्धा ऐकण्याची इच्छा करीत नाही.२२
. जगातील सर्व पदार्थ शरीराशीच संबंधित आहेत. ते शरीरासाठी तुष्टीपुष्टीप्रद आहेत. त्यामुळे मनुष्याचे मन त्याच्यातच संलग्न राहते. त्यापासून मुक्त होण्यासाठी त्याच्या अनित्यावर चिंतन करणे अपेक्षित आहे. साधकाने चित्त स्थिर करून निर्ममत्व होण्यासाठी क्षणोक्षणी संसाराच्या अनित्यत्वावर अथवा नश्वरवृत्तांवर चिंतन केले पाहिजे. त्या तृष्णारूपी काळ्या नागाला अभिमंत्रित करण्यासाठी अममत्व भावावर विचार केला
पाहिजे. २३
इथे हेमचंद्राचार्यांचा "तृष्णा कृष्णा हि मंत्राय" हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इथे 'तृष्णेचा' नाश करण्यास न सांगता तृष्णेला मंत्रित करण्याचा उल्लेख केला आहे कारण तृष्णेच्या नाशाबद्दल सांगितले असते तर त्यामुळे हिंसेचा भाव घोषित होतो. जैनाचार्य हे शब्द प्रयोगात किती सावधान आणि जागृत असतात हे ह्यावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर तृष्णेच्या नाशाच्या ठिकाणी तृष्णेला अभिमंत्रित करण्याचा उल्लेख एका विशेष अभिप्रायाचे सूचक आहे.
जोपर्यंत देह आहे तोपर्यंत इच्छेचा कधीच नाश होऊ शकणार नाही. तिला वळण दिले जाऊ शकते. ज्या इच्छा विषयोन्मुख आहेत त्यांना सत्त्वोन्मुख करता येईल. मानसशास्त्रांचे असे मानणे आहे की मनुष्याच्या मनोवृत्ती कधीही नष्ट केल्या जाऊ शकत नाहीत. त्यांच्या जागी इतर पूरक गोष्टींचाही स्वीकार करता येत नाही, परिष्कार केला जाऊ शकतो. वास्तविक ज्या इच्छा, भोग, वासना आणि आसक्ती एकत्रित जोडलेल्या आहेत त्या त्याग, वैराग्य, सेवा आणि साधनेच्या रूपात परिवर्तित होतात आणि जीवनाला अभ्युदयाच्या दिशेने घेऊन जातात. आचार्यांनी इथे 'अभिमंत्रित' शब्दाचा प्रयोग केला आहे. त्याचा भावार्थ असा आहे की मनोनिग्रहाद्वारे तृष्णेला जिंकणे. 'मंत्रित' हा एक प्रतिकात्मक शब्द आहे तो सर्पावर लागू होतो परंतु तृष्णेवर लागू होत नाही. मनोनिग्रहामध्ये