________________
(२८४)
ते शुभ ध्यानापासून विचलित झाले, वाईट विचाराच्या चिंतनाने आपल्या मूळ स्थितीला विसरले आणि बालपुत्रावर मोहासक्त होऊन विचार करू लागले माझ्या लहानशा मुलाचे राज्य शत्रू लुटण्यास तयार झाले आहेत, मंत्री सुद्धा विश्वासघातकी झाले आहेत, मी त्या शत्रूंना सहन करू शकत नाही. अशाप्रकारचे विकल्प मनात येऊ लागले. “मी एक साधु आहे, ध्यानावस्थेत आहे, मस्तकावरील केसाचे लुंचन केलेले आहे अशा प्रकारची मुनी अवस्था • जणू काही विसरूनच गेले. अशा वाईट विचारामध्ये शत्रूंशी मनाने युद्ध करू लागले. जणू शत्रूसेनेबरोबर शस्त्रास्त्रांनी युद्ध करीत आहेत. शेवटी सर्व शस्त्रे समाप्त झाली. जवळ एकही शस्त्र नसल्याने मुकुटाने शत्रूला मारण्यासाठी डोक्याला हात लावला तर स्वतःचे तुंचन केलेले मस्तक पाहून पश्चाताप करत करत शुक्लध्यानी झाले.
-
राजर्षी जेव्हा दुर्ध्यानामध्ये होते तेव्हा श्रेणिक राजा त्याच रस्त्याने प्रभू महावीरांच्या दर्शनासाठी जात होते. तेव्हा रस्त्यात प्रसन्नचंद्र राजर्षिना, "हे मुनी, महाध्यानी आणि मौनी आहेत इत्यादी शुभ भावनेने वंदन करून प्रभूंजवळ गेले. राजर्षिविषयी श्रेणिक राजाने भगवान महावीरांना विचारले हे प्रभू ! रस्त्यामध्ये जेव्हा मी प्रसन्नचंद्रमुनींचे ध्यानावस्थेत असताना दर्शन केले त्यावेळी जर त्यांचे आयुष्य पूर्ण झाले असते तर ते कोणत्या गतीला गेले असते ? प्रभू म्हणाले सातव्या नरकात. हे ऐकून श्रेणिक साश्चर्याने विचार करू लागले की ध्यानी मुनी नरकात जात नाहीत. कदाचित मी काही बरोबर ऐकले नसेल. म्हणून त्यांनी प्रभूंना पुन्हा विचारले की जर ह्यावेळी आयुष्य पूर्ण झाले तर कोठे जातील ? भगवान म्हणाले, "सर्वार्थसिद्ध विमानात" हे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या त्यांनी विचारले, "हे प्रभू ! क्षणभरापूर्वी आपण सातव्या नरकात जाण्याविषयी सांगत होता आणि आता लगेचच सर्वार्थसिद्धामध्ये जाण्याचे सांगत आहात हे कसे संभवू शकते?" यावर प्रभू म्हणाले, त्यावेळचे आणि आताचे राजर्षीचे ध्यान वेगवेगळे आहे कारण दुर्मुख सेनानीच्या शब्दश्रवणाने मुनी क्रोधित झाले होते. ज्यावेळी आपण वंदन केले त्यावेळी मुनींची भावना सातव्या नरकात जाण्यायोग्य होती आणि आता आपण इथे पोहचेपर्यंत सर्व शस्त्र समाप्त झाल्यावर शत्रूला मुकुटाने मारण्याच्या विचाराने डोक्याला हात लावताच डोक्याचे लुंचन पाहून 'मी कोण आहे' हे ध्यानात आले आणि दुर्ध्यानापासून स्वतःला दूर करून पुन्हा आत्मनिंदेत मग्न होऊन चिंतन करू लागले, "अरे ! मी जे युद्धाचे विचार केले ते एकदम चुकीचे आहेत कारण मी तर साधू आहे. मी तर राज्याचा त्याग केला आहे आणि कर्मक्षय करण्यासाठी आतापना घेण्यासाठी उभा आहे. अशा शुभ
-