________________
(२६१)
अभियोगी भावना
कृपया
बृहत्कल्पभाष्यामध्ये 'अभियोगी भावना' तिसरी आहे. उत्तराध्ययन सूत्रामध्ये भावनेचे नाव 'अभियोगी भावना आहे. संस्कृत वृत्तीमध्ये ह्याची व्याख्या करताना लिहिले आहे की जे उच्च देवांच्या सेवेमध्ये, परिचर्येच्या कार्यामध्ये नियुक्त असतात, केकरांप्रमाणे सेवक असतात त्या देवांना 'अभियोग्य' म्हणतात आणि त्यांच्या भावनेला अभियोगी भावना' म्हणतात. याचा अर्थ असा की ते देव हीन भावनेने युक्त असतात. अभियोगी भावनेचे विवेचन आशयरूप उत्तराध्ययन आणि बृहत्कल्प या दोन्हींमध्ये सारखेच
आहे.
अभियोगी भावनेचे प्रकार - १) कौतुक जीविता; २) भूतीकर्मजीविता; ३) प्रश्नजीविता; ४) प्रश्नाप्रश्न जीविता; ५) निमित्ता जीविता हे अभियोगी भावनेचे पाच प्रकार आहेत. १४३ ह्या पाच प्रकारांचे विवेचन असे आहे
१) कौतुक जीविता - मुलांचे रक्षण करण्यासाठी, सौभाग्य संपादन आणि संवर्धनासाठी स्त्रियांना विशेषरूपाने स्नानादी करविणे, भोग, शांती इत्यादी निमित्ताने अग्नीमध्ये हवन करणे, डोक्यावर मंत्रित हात फिरविणे, रोग निवारण करण्यासाठी अग्नीमध्ये हवन इत्यादी करून धूप देणे, अयोग्य वेष धारण करणे, वृक्ष इत्यादींचे आलिंगन करविणे, (अवस्तोमन-अनिष्ट रोगादींच्या शांतीसाठी थुतकारा टाकणे) बंध-गंडे दोरा इत्यादी बांधणे ह्या सर्व कर्मांना 'कौतुककर्म' म्हटले आहे. धर्ममार्गापासून विचलित करणारी ही कर्मे आहेत. ह्याच्या स्वरूपाचे चिंतन किंवा आचरण करणारी व्यक्ती 'अभियागी भावनेची' असते. साधू किंवा ब्रह्मचाऱ्याने केव्हाही ह्याचे आचरण करू नये. या दुर्भावनेपासून नेहमी सावध राहिले पाहिजे. १४४
-
(२) भूतिकर्म जीविता विद्या अथवा मंत्राद्वारे अभिमंत्रित भस्म किंवा माती दोरा किंवा तंतूबरोबर शरीराला बांधणे ह्याला भूतिकर्म म्हणतात. ह्याचे प्रयोजन घर, शरीर, द्रव्य इत्यादींचे उपद्रवापासून रक्षण करणे, कोणालाही आपल्या वशीभूत करणे, ज्वर इत्यादींचे स्तंभन करणे ही सर्व आत्मपराङ्गमुखतेची कार्ये आहेत. असे केल्याने साधकाचे मन व्रतपालन आणि त्यागवैराग्यापासून दूर होते. ह्या कुत्सित प्रभावांच्या दुष्परिणामांचे चिंतन करून त्यापासून दूर राहिले पाहिजे. १४५
३) प्रश्नाजीविता देवतादींना विचारणे, प्रश्न करणे ह्याला प्रश्नाजीविता म्हणतात. अंगठ्यामध्ये, उच्छीष्ठावर वस्त्रामध्ये, आरश्यामध्ये, तलवारीमध्ये, पाण्यामध्ये