________________
(२६४)
हतो, रसास्वाद प्रियता आणि गौर
यता आणि गौरव प्रशस्ती इत्यादींच्या भावनेने उपहत होतो. त्यासाठी बादी तप करतो त्याला 'संसक्त तपा' म्हणतात. वास्तविक आसक्तीपूर्वक
नही तप व्यर्थ आहे. आसक्ती पापाचे मूळ आहे, असे आसक्तीपूर्वक तप ये हे आसूरी भावनेचे लक्षण आहे.
३) निमित्तदेशिता - जसे पूर्वी अभियोगी भावनेमध्ये असे सांगितलेले आहे
भविष्य, वर्तमान तिन्ही काळांशी संबंधित निमित्त तीन प्रकारचे आहे. लाभकसान, सुख-दुःख, जीवन-मृत्यू यांच्या रूपात ते सहा प्रकारचे आहे. येथे हा प्रश्न स्थत होतो की अभियोगिक भावनेमध्ये ह्याचा उल्लेख केला आहे. तरी येथे हेच वर्णन हा का केले ? त्याचे समाधान केले आहे की अभिमानाच्या आवेशात किंवा अहंकाराच्या तीव्रतेमुळे एखादी व्यक्ती आसुरी भावना ठेवते म्हणून असुरी भावनेत अंहकाराची मुख्यता आहे. परंतु जेथे अंहकाराची भावना नसते, तेथे अभियोगी भावना होते.१५४
___१) निष्कृपता - कोणत्याही अन्य कार्यात आसक्त असणारा, निष्कृपकरुणारहित दयारहित भावनेने स्थावर एकेंद्रिय वनस्पती इत्यादींवर चालतो, बसतो, झोपतो. असे करताना त्याला थोडासुद्धा पश्चाताप होत नाही, कोणाच्या 'सत्' उपदेशाने प्रेरित होऊनही प्रायश्चित अथवा 'मिच्छामि दुक्कडं मिथ्या में दुष्कृतं' आपल्या असत् कार्याची निंदा करीत नाही. तो 'निष्कृप' आहे आणि अशी भावना निष्कृपता आहे.१५५ दया, अहिंसा इत्यादी विचार तोच करू शकतो ज्याच्या हृदयामध्ये कृपा आणि करुणा असेल. निष्कृप व्यक्ती संवेदनाशून्य असते.
५) निरनुकंपता - जो दुसऱ्यांना भयभीत झालेला पाहून क्रूरतेमुळे स्वतः किंचितही कंपित होत नाही. असे ज्याचे हृदय कठोर असते तो 'निरनुकंप' आहे. अनुकंपेच्या पूर्वी लागलेल्या 'अनु' उपसर्गाचा अर्थ 'मागे होणे.' अर्थात दुःखित प्राण्याला कपित झालेले पाहून स्वतः त्याच्यामागे कंपित होणे म्हणजे अनुकंपा होय. आणि ज्याच्या हृदयात अनुकंपा नाही तो निरनुकंप आहे.
___ येथे हे समजले पाहिजे की ‘कृपा' आणि 'अनुकंपा' यामध्ये सूक्ष्म अंतर आहे. कोणत्याही प्राण्याला दुःखी न करता प्रवृत्तीशील राहणे 'कृपा' आहे आणि दुःखितांना पाहून त्यांच्याबरोबर स्वतःही दुःखी होणे, स्वतः त्यांच्या दुःखात सहभागी होणे ही अनुकंपा आहे. दयेमध्ये जागृकतेचा भाव आहे तर अनुकंपेमध्ये परिरक्षणाचा आशय
आहे.