________________
(२६२)
किंवा बाहूंमध्ये देवता इत्यादींच्या येण्याची कल्पना करून प्रश्न विचारणे हे सीवितेच्या अंतर्गत येते. हे कपटयुक्त कार्य असल्याने धर्माच्या प्रतिकूल आहे, सायासारखे, परिहेय आहे असे समजून त्यापासून वेगळे राहणे, अलिप्त राहणे अपेक्षित
आहे. १४६
GEETRASANNINATIRSAND
४) प्रश्नाप्रश्न जीविता - ह्यात एखाद्याला प्रश्न विचारल्यावर तो स्वप्नात आपल्या अधिष्ठात्री देवीला त्या प्रश्नाचे उत्तर विचारतो आणि ती येऊन उत्तर देऊन जाते. दोन वेळा प्रश्न विचारला जात असल्याने याला प्रश्नाप्रश्न म्हणतात. स्वप्नात सांगितलेले उत्तर प्रश्न विचारणाऱ्याला सांगणे. डोमजातीची स्त्री आपल्या कुलदेवतेला अथवा यक्षाला प्रश्न विचारते, यक्षाद्वारे स्त्रीच्या कानामध्ये उत्तर सांगितले जाते. स्त्रीद्वारे प्रश्न विचारणाऱ्याला त्याचे शुभाशुभ फल सांगणे हे प्रश्नाप्रश्न जीवितामध्ये समाविष्ट आहे. हे निंद्य आणि नीच कर्म आहे. ह्याच्या चिंतनापासून दूर राहिले पाहिजे.१४७
५) निमित्त जीविता - निमित्त-भूत, वर्तमान, भविष्य असे तीन प्रकारचे आहे. ह्या तिन्ही काळात होणारा लाभ-तोटा, अनिष्ट-इष्ट इत्यादी जाणण्यासाठी चुडामणी वगैरे शास्त्रे आहेत. ती समजल्याशिवाय लाभ-तोटा यांचे ज्ञान होत नाही. त्यांच्या आधार दुसऱ्यांना नफा-तोटा दाखविणे, त्याच्याद्वारे जीवन चालवणे हे निमित्त जीवितेच्या अंतर्गत समाविष्ट आहे.
ऋद्धी, समृद्धी, संपत्ती, सुख, मोठेपणा इत्यादींच्या निमित्ताने कौतुकादी करणे ही अभियोगी भावना आहे. निःस्पृह भावनेने, आसक्ती न ठेवता, प्रवचन, प्रभावनेच्या लक्ष्याने कौतुकादी करणे ह्याचा या अशुभ भावनेमध्ये समावेश होत नाही. कारण तसे केल्याने चतुर्विध धर्मतीर्थाची प्रभावना होते तसे करणे आराधनेच्या अंतर्गत येते.१४८
शिवार्य आचार्यांनी 'अभियोगी'च्या ऐवजी 'अभियोग्य' शब्द घेतला आहे.
कुमारी कन्या वगैरेच्या अंगात भूतांचा संचार करणे, अकाली जलवृष्टी करणे इत्यादी आश्चर्यकारक प्रयोग करणे, अमावास्येच्या दिवशी चंद्र, दाखविणे, स्त्री अथवा पुरुषाला वश करणे, भूतिकर्म मंत्र प्रयोग करणे अथवा भूतांची क्रीडा दाखविणे, ह्या क्रिया करून आपले महत्त्व प्रदर्शित करण्यासाठी, मिष्टभोजनासाठी, किंवा इन्द्रियजन्य सुखासाठी केल्या तर त्याची ही 'अभियोग्य' भावना म्हटली जाईल. ह्या भावनेने जीवाची उत्पत्ती वाहनजातींच्या देवात होते. कोणी मुनी आपले अथवा इतरांचे आयुष्याचे भविष्य सांगण्यासाठी मंत्रउपयोग करील. धर्मप्रभावना करण्यासाठी असमय वृष्टी इ. करून दाखवेल