________________
(२८०)
रेवले. घोर तप केले ध्यान व आत्मचिंतन द्वारा योग साधनेत जीवन
वर्धापर्यंत मौन व्रत ठेवले होते व्यतीत केले.
'योग' सर्व विपत्तिरूपी वेलींना कापण्यासाठी तीक्ष्ण धारेच्या परशू अर्थात जादीसारखा आहे. तसेच मूळ मंत्र, तंत्राशिवाय मोक्षलक्ष्मीला वशीकरण करण्याचे अमोध पाय आहे.३ अर्थात योगच्या माहात्म्याने विपत्ती नष्ट होते.
योग हे परमार्थाने आत्म्यात असलेल्या कर्मसंयोगाच्या योग्यतेचा नाश करतो. आत्म्याच्या दोन प्रकारे वृत्त्या आहेत. १) स्थूल चेष्टा (आवागमन रूप) २) सूक्ष्मचेष्टा वासोश्वास रूप) ह्या कर्मसंयोग जन्य आहे. म्हणून कर्मसंयोगाची योग्यता संसार वृक्षाचे मळ आहे. वृत्ती तर पुष्प, पत्र यांच्यासारखी आहे. मुळाचा नाश झाला की त्याचा नाश आपोआप होतो.
अशुभयोगातून निवृत्त होऊन शुभ योगात प्रवृत्ती करणे. आणि अशुभ व शुभयोगाचा संपूर्णपणे निरोध करून शुद्धात्मभावात रमण करणे योग आहे. शेवटी अयोगी अवस्था प्राप्त होते त्याच्या फळ स्वरूपी सिद्धत्व प्राप्त होते.
'योग' शब्द उल्लासपूर्वक श्रवण करणाऱ्याच्या मिथ्यात्वमोहनिय पाप कर्माचा क्षय होतो. 'योग' मुळे मोक्ष प्राप्तिचे सर्व साधन प्राप्त होतात.
योगसाधनेसाठी सर्वप्रथम श्रद्धा, विश्वास असणे महत्त्वाचे आहे, नंतर आत्मशुद्धीची तळमळ, इच्छा, सिद्धत्व प्राप्तीची भावना आणि त्याचबरोबर आत्मसमर्पण अनिवार्य आहे. जीवनात सर्व कलेत श्रेष्ठ कला असेल तर योगकला आहे.
भावनायोगाने अनादिकाळाच्या मलीन वृत्तीची निवृत्ती होते आणि ज्ञान, ध्यान इत्यादी गुणांच्या अभ्यासात अनुकूलता येते, चित्ताची विशुद्धी वाढते.
शुभभावनेने सम्यग्दर्शन ज्ञान आणि चारित्र गुणाची प्राप्ती व विकास होतो म्हणून भावनेबरोबर योग शब्द जोडला आहे. आचार्य हरिभद्रसूरींनी योगविंशिकामध्ये धर्माच्या प्रत्येक क्रियेला योग म्हटले आहे. धर्म मोक्षाचा हेतूभूत आहे, धर्म मोक्षाचे साधन आहे म्हणून धर्माचा जितका परिविशुद्ध व्यापार आहे त्या सर्वांना योग म्हटले आहे.
ह्या ग्रंथाचा मूळ विषय ‘भावना योग' आहे. कोणती ही साधना सुरू करताना प्राचीन जीवनाचे विघटन आणि नव्या जीवनाचे सुघटन होते ह्या जीवन निर्माणाच्या प्रक्रियेत भावनेची फार मोठी उपयोगिता आहे.