________________
(२४०)
क्षणाम सोडून देतो आणि भयंकर क्लेशमय महापाप करू लागतो. या पापामुळे गोदसुद्धा जाऊ शकतो. म्हणून मुमुक्ष जीवाने असा आत्मघातकी अभिमान
करू नये ९२
अभिमानाच्या विरुद्ध विनय, नम्रता, जैनशासनाचे मूळच आहे- 'विनय मूल धम्मो विनय मोक्ष देणारा आहे. विनयी सर्वांचा प्रिय असतो. बिनयामुळे ज्ञान, ज्ञानाने समकित, समकितने चारित्र आणि चारित्राने मोक्ष प्राप्त होतो.
प्रत्येक सद्गुणाच्या मुळाशी विनय असतोच. म्हणून कोणत्याही प्रकारचा अभिमान मनात निर्माण झाला की लगेच आपल्यापेक्षा अधिक गुणीसंपन्न व्यक्तींकडे पहावे हणजे आपल्यातील गुण किती नगण्य आहेत हे लक्षात येईल व अभिमान आपोआप गळून जाईल.
नाही.
मायानुबंधी भावना
क्रोध व मान या नंतर माया माया हे शल्य आहे, या शल्यामुळे सुख लाभत
मायावी, कपटी माणसाला कोणीही जवळ करीत नाही. त्याच्यावर कुणाचाच विश्वास रहात नाही. त्याला अपमानित जीवन जगावे लागते. मायावी व्यक्तीचे नातलग कोणीच नसतात, अशा माणसाचा लहान अपराधसुद्धा मोठा मानला जातो. मायावी माणूस सत्य बोलला तरी त्याच्यावर विश्वासच बसत नाही. कपटी वर्तनाने मैत्रीचा नाश होतो. ज्याप्रमाणे विषयुक्त दूध प्राशन केले तर नाश निश्चितच होतो, त्याचप्रमाणे मायेमुळे मित्र विनाश व श्रामण्य हानी होते.
जिथे मायेचा निवास तेथे क्रोध, मान आणि लोभ हे शत्रू असतातच.
९३
क्रोध आला तर तो दिसतो, मान ही दिसतो, पण माया प्रत्यक्ष दिसत नाही. मायेचे स्थान पोट आहे. माया प्रकृतीला वक्र करते. शास्त्रामध्ये याचा पुष्कळ उल्लेख होता. 'माया मोसो', 'मायामिथ्या' इ. जिथे माया आहे तेथे मिथ्यात्व
मायावी पुरुष मरून स्त्री होतो. स्त्रीने माया ( कपट) केली तर मरून नपुंसक होते. नपुंसकाने माया केली तर मरून तिर्यच गती मिळते. आणि मायावी तियंच तर मरून एकेन्द्रियामध्ये जाऊ शकतो. अशाप्रकारे माया केल्याने नीच गती मिळते. मायाने युक्त तप, संयम याचे फळ पण उच्चप्रकारचे मिळत नाही.